Mahindra XUV700 EV: लवकरच येणार Mahindra XUV700 Electric; टेस्टिंग सुरू, कधी लॉन्च होणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 05:58 PM2023-05-23T17:58:02+5:302023-05-23T17:58:36+5:30
Mahindra XUV700 EV: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कंपन्या विविध मॉडेल्स लॉन्च करत आहेत.
Mahindra XUV700 Electric:महिंद्रा एक्सयूवी 700 ही (Mahindra XUV700) ही भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV पैकी एक आहे. अलीकडेच महिंद्रा एक्सयूवी 700 चाचणीदरम्यान दिसली आहे. ही महिंद्राची इलेक्ट्रिक एक्सयूवी 700 असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही Mahindra XUV.e8 नावाने सादर केली जाऊ शकते. ही INGLO मॉड्यूलर इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
कंपनीने गेल्या वर्षी ब्रिटेनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सांगितले होते की, ते आगामी काळात बॉर्न इलेक्ट्रिक रेंज अंतर्गत पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे. यांना महिंद्राच्या दोन सब-ब्रांड्स- XUV.e आणि BE अंतर्गत लॉन्च केले जाईल. याशिवाय, पहिले मॉडेल XUV.e डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च होईल आणि पहिले BE ईव्ही मॉडेल ऑक्टोबर 2025 मध्ये लॉन्च केले जाईल.
अंदाज वर्तवला जात आहे की, महिंद्रा एक्सयूवी700 इलेक्ट्रिक (Mahindra XUV.e8) च्या फायनल प्रोडक्शन व्हर्जनमध्ये क्लोज-ऑफ फ्रंट ग्रिल, फुल वाइड एलईडी लाइट बार, शॉर्प डिझाइन केलेले बोनट आणि अॅग्युलर स्टांससह बम्पर माउंटेड हेडलॅम्प्स मिळतील. याचे इंटीरिअर लेआउट XUV700 च्या ICE व्हर्जनसारखेच असेल.