महिंद्राची ईलेक्ट्रीक एक्सयुव्ही ४०० की नेक्सॉन ईव्ही; स्वस्त कोणती, जास्त रेंज कोणाची?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 03:27 PM2024-01-04T15:27:30+5:302024-01-04T15:27:51+5:30
दोन्ही स्वदेशी, फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत. आता त्यांना लुक, रिलायबल आणि रेंज आदी गोष्टींवर ग्राहकांना आकर्षित करावे लागणार आहे.
महिंद्रा आणि टाटामध्ये ईलेक्ट्रीक एसयुव्हीवरून सध्या स्पर्धा आहे. महिंद्राची एक्सयुव्ही ४०० ची फेसलिफ्ट लवकरच येत आहे. या ईलेक्ट्रीक एसयुव्हीची टाटाच्या नेक्सॉनशी कडवी टक्कर होणार आहे. दोन्ही स्वदेशी, फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत. आता त्यांना लुक, रिलायबल आणि रेंज आदी गोष्टींवर ग्राहकांना आकर्षित करावे लागणार आहे.
टाटाकडे वेगवेगळ्या श्रेणीतील फुल रेंज असताना महिंद्राने या एसयुव्हीला दोन व्हेरिअंटमध्ये दाखल केले आहे. Mahindra XUV400 EV EC आणि EL या प्रकारांत मिळते. ईसीची किंमत 15.99 लाख रुपये असेल तर ईएलची किंमत 18.99 लाख (एक्स-शोरूम) असणार आहे.
गेल्या वर्षी महिंद्राची ईलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच करण्यात आली होती. यंदा या २०००० कार विकण्याचे कंपनीने उद्दीष्ट ठेवले आहे. इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही पाच वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आर्क्टिक ब्लू, एव्हरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू, सॅटिन कॉपरच्या ड्युअल-टोन पर्यायासह हे रंग मिळणार आहेत.
इलेक्ट्रिक मोटर 147 hp कमाल पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करते. 8.3 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग पकडू शकते. टॉप स्पीड 150 kmph आहे, जो भारतात पुरेसा आहे. XUV400 इलेक्ट्रिक SUV ची बॅटरी क्षमता 39.4 kWh आहे. Mahindra XUV400 ची ड्रायव्हिंग रेंज 456 किमी आहे. Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करणारी 17.78 cm इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.
Tata Nexon EV Max तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - XZ+, XZ+ लक्स आणि जेट एडिशन. Nexon EV Max ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 18.34 रुपये आहे, जी टॉप मॉडेलसाठी 20.04 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. टाटाची कार 143bhp आणि 250Nm शक्ती प्रदान करते. Tata Nexon EV Max electric SUV फक्त 9 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग घेऊ शकते.
ब्लूसेन्स प्लस अॅप देण्यात आले असून 60 हून अधिक मोबाइल अॅप आधारित वैशिष्ट्ये कनेक्ट करता येतात. ऑटो हेडलॅम्प, स्मार्ट घड्याळ कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ORVM, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेटसह कनेक्टेड कार तंत्रज्ञान सिंगल-पेन सनरूफ, लेदरेट सीट आदी देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक एसयूव्हीला 6 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.