टाटा EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV; जाणून घ्या वैशिष्टे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 01:34 PM2022-09-04T13:34:51+5:302022-09-04T13:35:32+5:30

ही कार Mahindra XUV300 वर आधारित असेल, ज्यात एक शक्तिशाली बॅटरी असेल.

Mahindra's first electric XUV launch at 8 September; Know the features | टाटा EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV; जाणून घ्या वैशिष्टे

टाटा EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV; जाणून घ्या वैशिष्टे

googlenewsNext

मुंबई - भारतातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी, महिंद्रा अँड महिंद्रा आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. ८ सप्टेंबर रोजी, महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकचे अनावरण केले जाणार आहे आणि त्यानंतर त्याच्या किंमतीसह महिंद्रा XUV400 मध्ये Tata Nexon EV ला टक्कर देण्यासाठी काय खास आहे हे कळेल. 

ही कार Mahindra XUV300 वर आधारित असेल, ज्यात एक शक्तिशाली बॅटरी असेल. गेल्या काही दिवसांमध्ये, Mahindra XUV400 इलेक्ट्रिक बद्दल अनेक नवीन माहिती समोर आली आहे, त्यानुसार ती ४.२ मीटर लांब असेल आणि इलेक्ट्रिक सनरूफ देखील मिळेल. त्याच वेळी, लुक आणि डिझाइनच्या बाबतीत, याला XUV300 सारखेच हेडलॅम्प आणि बूमरॅंग आकाराचे एलईडी डीआरएल मिळतील. XUV300 पेक्षा चांगली केबिन स्पेससह, XUV400 ला नवीन डिझाइन केलेले 17-इंच अलॉय व्हील मिळतील. एकूणच, महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक SUV ला आधुनिक डिझाइन तसेच नवीन वैशिष्ट्यांचा कॉम्बो मिळेल.

मोठा बॅटरी पॅक
आगामी महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकच्या संभाव्य बॅटरीबद्दल बोलाल तर एलजी कंपनीचा मोठा बॅटरी पॅक त्यात दिसू शकतो. ही इलेक्ट्रिक SUV ४५ kWh पर्यंतच्या बॅटरीद्वारे चालविली जाऊ शकते, ज्याची बॅटरी एका चार्जवर ४०० किमी पर्यंत रेंज असू शकते. त्याची इलेक्ट्रिक मोटर १५०bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्ट, वायरलेस चार्जिंग, रीअर एसी व्हेंट्स, मल्टिपल एअरबॅगसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमसह अनेक स्टँडर्ड  आणि सेफ्टी वैशिष्ट्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार Advanced Driving Assistant System (ADAS) आगामी Mahindra XUV400 मध्ये देखील दिसू शकते.
 

Web Title: Mahindra's first electric XUV launch at 8 September; Know the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.