तुमच्या स्वतःच्या कारच्या नोंदी नीट ठेवा जपून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 06:00 PM2017-09-11T18:00:00+5:302017-09-11T18:00:00+5:30

आपल्या मालकीची कार ही केवळ मालमत्ता नाही, ती जबाबदारीही आहे. तिचे तपशील, विविध आवश्यक नोंदी या तुम्ही नेहमी जरूर नोंद करा व अद्ययावत राहा

Maintain your own car records | तुमच्या स्वतःच्या कारच्या नोंदी नीट ठेवा जपून

तुमच्या स्वतःच्या कारच्या नोंदी नीट ठेवा जपून

Next
ठळक मुद्देकारच्या प्रत्यक्ष शारीरीक जबाबदारीप्रमाणेच कारच्या कुंडलीची नोंदही एक जबाबदारी असतेसर्व्हिस सेंटर जसे चालवले जाते तसे तुमच्या कारबाबतही तुम्ही तशा नोंदी ठेवणे अतिशय गरजेचे असतेएखादा भाग कधी बदलला, ऑइल चेंज, वायपर ब्लेड बदल, इंधन भरणं आदी विविध माहिती लिहून ठेवा

काल मालकीची असली म्हणजे ती मालमत्ता नव्हे तर एक जबाबदारी असते. कार म्हणजे मालमत्ता आहे, तिला रिसेल किंमत आहे, असे काही जण समजत असले तरी ते पूर्ण बरोबर नाही. अॅन्टिक कार असले तरीही ती मालमत्ता नसते, तर जबाबदारीच असते. मग ती जबाबदारी तुमच्या कारच्या बाबतीत प्रत्यक्ष दुरुस्ती देखभालीची असो की, कारच्या कागदपत्रांची असो की, कारच्या देखभाल, विमा आदी तपशीलांची असो. कारची ही जबाबदारी प्रत्येक कार मालकाने नीटपणे पार पाडायलाच हवी. त्याचा कधी व कसा वापर करावा लागेल, हे काही सांगता येत नाही. यासाठीच कार ही केवळ मालमत्ता आहे, प्रेस्टिजचे एक साधन आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन आहे इतकेच समजू नये.

कारच्या प्रत्यक्ष शारीरीक जबाबदारीप्रमाणेच कारच्या कुंडलीची नोंदही एक जबाबदारी असते. एखाद्या कार उत्पादकाचे सर्व्हिस सेंटर जसे चालवले जाते तसे तुमच्या कारबाबतही तुम्ही तशा नोंदी ठेवणे अतिशय गरजेचे असते. कार असो वा तुमचे दुचाकी वाहनही असो. आज नव्या काळामध्ये मोबाइलसारखे अतिशय चांगले साधन तुम्ही वापरत असता. त्यामध्ये असलेल्या कॅमेऱ्यापासून, नोट, डायरी, कॅलेंडर या प्रकारच्या साध्या साध्या अॅपचाही वापर तुम्ही करीत असता. मात्र तुमच्या स्वतःच्या कारसाठी वा वाहनासाठी तो वापर अनेकजण करीत नाहीत. खरे म्हणजे हार्डकॉपी तयार करून ही सारी नोंद कराच पण त्याचबरोबर लॅपटॉप, पी.सी., मोबाईलसारख्या साधनांचा वापर करूनही ही माहिती तुम्ही त्यात साठवू शकता, अद्ययावत ठेवू शकता. नव्हे तशी ठेवण्याची नक्कीच गरज आहे. 
कारसंबंधात माहिती नोंदवताना तुम्ही तीन भाग पाडा. त्यातमध्ये कारच्या उत्पादकाची,कार विकत घेतल्याची, कारमध्ये अतिरिक्त महत्त्वाची साधने लावली असतील त्याची तसेच तुमच्या मालकीसंबंधातील नोंदीची माहिती व कारचे छायाचित्र आदी माहिती जरूर नोंद करा. विमा, वॉरंटी, अतिरिक्त वॉरंटी, बॅटरीची वॉरंटी, बिल वा संबंधित कागद, वाहन चालनाचा परवाना वा संलग्न बाबींची कागदपत्रे यांची माहिती टेक्स्टद्वारे वा छायाचित्राद्वारे नोंद करू शकता. मोबाईल, पीसी, लॅपटॉपवर ते सारे साठवता येते.

दुसऱ्या भागामध्ये तुमच्या कारच्या देखभालीचे म्हणजे सर्व्हिसचे तपशील तुम्ही नोंद करू शकता. यासाठी वरील इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करू शकालच. खास करून मोबाईलमध्ये वा जीमेलचा वापर करत असाल तर कॅलेंडर, कीप, डॉक्युमेंट, छायाचित्र या अॅपचा वापर करू शकाल. तुमच्या कारची वा वाहनाच्या सर्व्हिसिंगचे तपशील, एखादा भाग कधी बदलला, ऑइल चेंज, वायपर ब्लेड बदल आदी विविध माहिती त्यामध्ये टाकू शकाल. हे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटे वेळ लागेल.

तिसऱ्या भागामध्ये तुम्ही तुमच्या कारमध्ये एक छोटीशी डायरी ठेवून त्यात इंधन भरण्याची तारीख, त्यानुसार तुमच्या गाडीचे रनिंग किती झाले त्यानुसार असलेली मीटरची नोंद, कुठे व कधी तुम्ही जाता त्याची नोंद करू शकता. मोबाईलमध्येही ही नोंद करू शकता.यामुळेही तुम्हा स्वतःच्या माहितीसाठीही उपयोग होईल व कारचे मायलेज किती मिळते, तुम्ही जात असलेल्या विविध ठिकाणांचे अंतर किती व कसे आहे याची नोंदही तुम्हाला आपोआप मिळणार आहे. या तीन प्रकारच्या नोंदींबरोबरच घरामध्येही एकत्रितपणे तुम्ही या नोंदी ठेवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमचा थोडासा वेळ द्यावा लागेल.

 

Web Title: Maintain your own car records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.