वाहन चालक-मालकांनी इकडे लक्ष द्यावे! 'फिटनेस'वर गडकरींच्या मंत्रालयाने घेतला महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 05:56 PM2022-02-04T17:56:37+5:302022-02-04T18:08:28+5:30
Ministry of Road Transport and Highways : अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांना सरकारने मान्यता दिलेल्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधून (Automated Testing Station) फिटनेस मिळवावा लागेल.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) जुन्या वाहनांच्या फिटनेसबाबत (fitness) मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील वर्षापासून वाहनांचे फिटनेस सरकारद्वारे रजिस्टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग स्टेशनमधून (Automated Testing Station) करणे बंधनकारक आहे. याशिवाय, इतर कोणत्याही फिटनेस सेंटरमधील फिटनेस वैध असणार नाही.
यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी करून वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी डेड लाइन ठेवली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांना सरकारने मान्यता दिलेल्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधून (Automated Testing Station) फिटनेस मिळवावा लागेल.
1 एप्रिल 2023 पासून अवजड वाहने आणि अवजड प्रवासी वाहने आणि मध्यम भार असलेली वाहने आणि प्रवासी वाहने आणि कमी वजनाची वाहने 1 जून 2024 पासून सरकारी मान्यताप्राप्त ऑटोमेटिक टेस्टिंग स्टेशनवरून (Automated Testing Station) करणे बंधनकारक असेल. तसेच, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी दोन वर्षांसाठी आणि आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी एक वर्षाचे असणार आहे.
याचबरोबर, रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत या संदर्भात जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. लोकांना 30 दिवसांत सूचना करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. लोक आक्षेप आणि सूचना संयुक्त सचिव (परिवहन), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 यांना किंवा comments-morth@gov.in या ईमेलद्वारे पाठवू शकतात.