भारतात 4 लाखांना मिळणारी Maruti Alto पाकिस्तानात कितीला मिळते, किंमत ऐकून बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 15:59 IST2023-05-08T15:58:53+5:302023-05-08T15:59:06+5:30
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

भारतात 4 लाखांना मिळणारी Maruti Alto पाकिस्तानात कितीला मिळते, किंमत ऐकून बसेल धक्का...
Maruti Car Price in Pakistan:भारत आणि पाकिस्तान, हे दोन्ही देश एकाच वेळी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाले. पण, आज अनेक बाबतीत भारतपाकिस्तानच्या खुप पुढे गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान महागाईमुळे चर्चेत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, पाकिस्तानात अनेक वस्तूंचे दर भारतापेक्षा दुप्पट आहेत. पाकिस्तानमध्ये पीठ, तेल, साखरेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले असेल. पण तुम्हाला तिथल्या गाड्यांच्या किमतीबद्दल माहिती आहे का?
आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानमधील कारचे दर सांगणार आहोत. आज आपण मारुतीच्या अल्टो कारच्या किमतीच्या आधारावरुन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की, भारत आणि पाकिस्तानमधील कारच्या दरात किती फरक आहे? यानंतर तुम्हाला समजेल की पाकिस्तानची सध्याची परिस्थिती किती वाईट आहे.
भारतात मारुती अल्टोची किंमत किती ?
भारतात मारुती कारची किंमत 4.4 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5 लाख रुपयांपर्यंतची मॉडेल्स उपलब्ध आहेत. ही भारतातील कारची एक्स-शोरूम किंमत आहे. याशिवाय काही कर आणि विम्यानंतर किंमत वाढू शकते. अल्टो कार भारतात सुमारे 4 लाख रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.
पाकिस्तानमध्ये अल्टो कारची किंमत किती ?
दुसरीकडे, पाकिस्तानातील अल्टोचा दर पाहिला तर पाकिस्तानी रुपयानुसार तेथील दर खूप जास्त आहेत. अनेक पाकिस्तानी वेबसाइट्सनुसार, Alto VX ची पाकिस्तानमध्ये किंमत रु. 22,51,000 आहे. याशिवाय Alto VXR कार 26,12,000 रुपयांना, Alto VXR-AGS कार 27,99,000 रुपयांना, Alto VXL-AGS कार 29,35,000 रुपयांना उपलब्ध आहे.