फक्त 50 हजार रुपयांत घरी आणा मारुती Alto CNG कार, 35 Kmpl देईल मायलेज!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:29 PM2022-10-20T12:29:24+5:302022-10-20T12:43:06+5:30
Maruti alto 800 cng : अल्टो सीएनजी 35 कि.मी. प्रति लिटर मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. अ
नवी दिल्ली : मारुती अल्टो ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारची कॉम्पॅक्ट साइज, उत्तम मायलेज आणि परवडणारी किंमत यामुळे एखाद्या फॅमिलीसाठी एक शानदार पसंती बनली आहे. मारुतीची ही कार अल्टो 800 आणि अल्टो K10 या दोन व्हेरिएंटमध्ये येते. विशेष बाब म्हणजे कंपनी सीएनजी किटसह अल्टो 800 देखील विकते.
अल्टो सीएनजी 35 कि.मी. प्रति लिटर मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी त्याचे EMI Calculator घेऊन आलो आहोत. उदाहरणार्थ, आम्ही डाउन पेमेंटची रक्कम 50 हजार रुपये ठेवली आहे. तुम्ही तुमच्या खिशानुसार कमी-जास्त ठेवू शकता.
50 हजारात मारुती अल्टो सीएनजी कार आणा घरी
मारुती अल्टो 800 ची सीएनजी व्हर्जन फक्त LXI व्हेरिएंटमध्ये येते. या कारची किंमत 5.03 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ऑनरोड तुम्हाला जवळपास 5.55 लाख रुपये खर्च येईल. येथे आम्ही 50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह आणि 5 वर्षांच्या कर्जाच्या कालावधीसह बँक व्याज दर 10 टक्के ठेवला आहे. जर तुम्ही 50 हजार रुपयांचे डाउन पेमेंट भरले तर तुम्हाला दरमहा जवळपास 10,600 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. एकूण 5 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला फक्त 1,37,173 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
इंजिन आणि मायलेज
मारुतीची ही हॅचबॅक कार 0.8-लीटर पेट्रोल इंजिनसह येते (48PS आणि 69Nm जनरेट करते). यात पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. सीएनजीवर चालवल्यावर आउटपुट कमी होईन 41PS आणि 60Nm पर्यंत होते. कंपनीच्या मते, कारचे मायलेज पेट्रोलसाठी 22.05kmpl आणि सीएनजीसाठी 31.59km/kg आहे.