मारुतीची अल्टो ८०० - शहरी वाहतुकीतील कोंडीतूनही वाट काढणारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 08:00 AM2017-09-05T08:00:00+5:302017-09-05T08:00:00+5:30
मारुतीची अल्टो ८०० ही मारुतीची सध्याची सर्वात छोटी कार म्हणावी लागते. विशेष करून शहरी भागामध्ये गेल्या काही काळापासून सीएनजीवर चालणाऱ्या मारुती ८०० या कारला जास्त पसंती मिळत गेली
मारुतीची अल्टो ८०० ही मारुतीची सध्याची सर्वात छोटी कार म्हणावी लागते. विशेष करून शहरी भागामध्ये गेल्या काही काळापासून सीएनजीवर चालणाऱ्या मारुती ८०० या कारला जास्त पसंती मिळत गेली. बसायला फार आरामदायी नसली तरी शहरी प्रवासामध्ये किंवा जवळच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी मारुतीची ही कार अनेकांनी पसंत केली. विशेष करून सीएनजी व त्यावर मिळणाऱ्या किंमतीच्या तुलनेतील चांगल्या मायलेजसाठी मारुतीची अल्टो ८०० ला जास्त पसंती मिळाली.
मुंबई, पुणे या शहरांमध्ये अनेकांना शहरातील वापरासाठी ही निवडली. तसेच कमी किंमत व आपल्याकडे मोटारीचे सुख असावे, अशा दृष्टीनेही अनेक सामान्यांना ही कार आवडली. मुळात अल्टोसारखी कार मारुतीच्या ब्रॅँडनेममुळे जास्त लोकप्रिय झाली. उंच व्यक्तींना मात्र तशी अतिशय त्रासदायक ठरू शकेल, त्या तुलनेत फूटस्पेस नाही तसेच मागील आसनावर बसणारी व्यक्ती उंच असात कामाची नाही. साधारण ५ ते साडेपाच फुटांपर्यंत उंची असणाऱ्यांसाठी ही कार बऱ्यापैकी आरामदायी असू शकते.
छोटी असली तरीही लांबच्या प्रवासाला एक-दोन जणांना आरामदायी ठरू शकेल. मात्र जास्त माणसे बसल्यास व चालक काहीसा उंच असेल तर त्याच्यामागे बसणाऱ्या व्यक्तीला मग मात्र बसणे त्रासदायक होऊ शकते. तीन जणांच्या कुटुंबाला व अति उंच नसलेल्यांना अल्टो ८०० चालू शकते. छोटेखानी असल्याने एक मात्र चांगले आहे की, वाहतूक कोंडीतून निसटताना फार त्रास सहन करावा लागत नाही.
हेडलॅम्प पॉवरफूल असून रात्रीच्यावेळी समोरच्या वाहनाच्या लाईटचा प्रखर त्रास मात्र सहन करावा लागतो. कारण ही तशी बसकी असल्याने साहजिकच समोरच्या वाहनाचा प्रकाशझोत थेट डोळ्यावर येतो. सीएनजी इंधनामुळे मात्र कारने मिळवलेले मायलेज अनेकांना पसंत पडले व रफटफपणे वापरण्यासही त्यामुळे लोकांना आवडेल असेच हे अल्टो ८०० चे रुप आहे हे नक्की.
तांत्रिक वैशिष्ट्ये
पेट्रोल
इंजिन- ७९६ सीसी , ३ सिलिंडर,
पेट्रोल, बीएस ४,
कमाल ताकद - ३५.३ केडब्ल्यू @ ६०००आरपीएम / ३०.१ केडब्ल्यू @ ६०००आरपीएम (सीएनजी)
कमाल टॉर्क - ६९ एनएम @ ३५०० आरपीएम /६० एनएम @ ३५०० आरपीएम (सीएनजी)
गीयर्स - एकूण पाच. हाताने टाकण्याचे. केबल टाईप गीयर शिफ्ट सुविधा
लांबी, रुंदी व उंची (सर्व मिमि) - ३४३०/ १५१५/ १४७५
व्हीलबेस - २३६०मी
टर्निंग रेडियस - ४.६ मी
ग्राऊंड क्लीअरन्स - १६० मिमि.
बूट स्पेस - --- ली.
ब्रेक - फ्रंट व रेअर - डिस्क व ड्रम
इंधन टाकी क्षमता - ३५ लीटर / सीएनजी ६० लीटर समतुल्य
टायर व व्हील - १४५/8८०आर १२ स्टील रिम