मोठी संधी! अवघ्या ९ हजारांचा EMI भरा अन् खरेदी करा देशाची सर्वात फेव्हरेट CNG कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 06:04 PM2022-08-01T18:04:05+5:302022-08-01T18:04:39+5:30

Alto 800 ही देशातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक कार आहे. कारच्या सीएनजी व्हर्जनला देखील खूप पसंती मिळाली आहे.

maruti alto emi calculator and downpayment lxi cng optional | मोठी संधी! अवघ्या ९ हजारांचा EMI भरा अन् खरेदी करा देशाची सर्वात फेव्हरेट CNG कार

मोठी संधी! अवघ्या ९ हजारांचा EMI भरा अन् खरेदी करा देशाची सर्वात फेव्हरेट CNG कार

Next

Alto 800 ही देशातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक कार आहे. कारच्या सीएनजी व्हर्जनला देखील खूप पसंती मिळाली आहे. कारची कमी किंमत आणि जास्त मायलेज हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे. तुम्ही महागड्या पेट्रोलऐवजी सीएनजीवर चालणारी कार शोधत असाल, तर तुमच्यासाठी अल्टो 800 सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

खूप कमी डाउन पेमेंट देऊन तुम्ही ही कार तुमच्या घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला दर महिन्याला खूप कमी EMI भरावा लागेल. मारुतीने अल्टो सीएनजी कारची एक्स-शोरूम किंमत 5.03 लाख रुपये निश्चित केली आहे. कारची ऑन-रोड किंमत 5.48 लाख रुपये इतकी आहे. तुम्हाला एक लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह कार घ्यायची असेल, तर जाणून घ्या तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल?

९% व्याजानं मिळवा ५ वर्षांसाठी कर्ज
LXI ऑप्शनल S-CNG ची ऑन-रोड किंमत 5.48 लाख रुपये आहे, जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 4,48,646 रुपये कर्ज घ्यावे लागेल. क्रेडिट स्कोअरवर अवलंबून, तुम्हाला बँकेचे 9% व्याज मिळू शकते. तुम्ही 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला 5,58,780 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला एकूण मूळ रकमेवर 1,10,134 रुपये अधिक व्याज द्यावे लागेल.

EMI किती असेल?
जर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा EMI किती भरावा लागेल असा प्रश्न पडला असेल तर 9 टक्के व्याजानुसार 4.48 लाखांच्या कर्जावर दरमहा 9,313 रुपये द्यावे लागतील. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, तुम्हाला ९ टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते, परंतु तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असल्यास तुम्हाला जास्त व्याजदर सोसावा लागेल. व्याजदर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून असतो.

CNG चा फक्त LXi (O) व्हेरिअंट
जर तुम्हाला अल्टोमध्ये सीएनजी कार घ्यायची असेल, तर तुम्हाला कंपनीकडून फक्त 800 LXI ऑप्शन व्हेरिएंट मिळेल. या प्रकारात तुम्हाला टचस्क्रीन, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, पॉवर विंडो, व्हील कव्हर्स, पॅसेंजर एअरबॅग, ड्रायव्हर एअरबॅग, पॉवर स्टीयरिंग आणि एअर कंडिशनर ही वैशिष्ट्ये मिळतील. कंपनीकडून या व्हेरिअंटमध्ये तुम्हाला 6 वेगवेगळ्या रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. यात सिल्की सिल्व्हर, ग्रेनाइट ग्रे, मोहितो ग्रीन, सेरुलियन ब्लू, सॉलिड व्हाइट आणि अपटाउन रेड यांचा समावेश आहे.

Web Title: maruti alto emi calculator and downpayment lxi cng optional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.