मध्यम वर्गींयांसाठी जबरा कार; 35 KM चे मायलेज अन् किंमत 4 लाखांपेक्षा कमी....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 04:03 PM2023-04-18T16:03:05+5:302023-04-18T16:03:22+5:30

मारुती सुझुकीने गेल्यावर्षी ही स्वस्त कार लॉन्च केली होती. फक्त एक लाखात कार घरी घेऊन या.

Maruti Alto K10 best car for middle class family; Mileage of 35 KM and price less than 4 lakhs.... | मध्यम वर्गींयांसाठी जबरा कार; 35 KM चे मायलेज अन् किंमत 4 लाखांपेक्षा कमी....

मध्यम वर्गींयांसाठी जबरा कार; 35 KM चे मायलेज अन् किंमत 4 लाखांपेक्षा कमी....

googlenewsNext


Maruti Alto K10: उन्हाळा सुरू झाला असून, उन्हामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण बाईकवरुन कारकडे वळण्याचा विचार करत आहेत. पण, कारच्या वाढलेल्या किमती आणि कमी मायलेजमुळे अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहते. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही भारतातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत. 

आम्ही मारुती सुझुकीने मागच्या वर्षीच लॉन्च केलेल्या Alto K10 कारबद्दल बोलत आहोत. ही कार पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. कार सीएनजीसह हायवेवर 60 ते 80 च्या वेगाने गाडी चालवल्यास सुमारे 35 किमी मायलेज मिळते. K10 च्या CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5.95 लाख रुपये आहे. ऑन-रोड किंमत सुमारे रु.7.7 लाखांपर्यंत जाते. जर तुम्ही 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करून कार खरेदी केली तर 7 वर्षांसाठी कारचा हप्ता सुमारे 8 हजार रुपये येईल.

Alto K10 ची किंमत... 
कंपनीने 18 ऑगस्ट 2022 रोजी Maruti Alto K10 भारतात लॉन्च केली होती. मारुती अल्टो K10 ची किंमत 4.59 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 6.80 लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन Maruti Suzuki Alto K10 चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात Std, LXi, VXi आणि VXi+ यांचा समावेश आहे. CNG व्हर्जन केवळ VXI मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.

इंजिन आणि कलर ऑप्शन
Maruti Suzuki Alto K10 ला 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते, जे 66bhp ची कमाल पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये पाच-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा ऑटोमेशन युनिट आहे. नवीन Alto K10 मध्ये पाच लोक बसण्याची क्षमता आहे. 2022 मारुती अल्टो K10 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात सॉलिड व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्रेनाइट ग्रे, सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड यांचा समावेश आहे.

इंटेरिअर आणि फीचर्स
मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये सिल्व्हर अॅक्सेंट, सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, सक्रुलर एसी व्हेंट्स, चार पॉवर विंडो, सेंटर कन्सोलवर कप होल्डर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि स्टीयरिंगसह ब्लॅक इंटीरियर थीम मिळते. सुरक्षिततेसाठी कारमध्ये 2 एअरबॅग, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टम आणि सीट-बेल्ट रिमाइंडर सिस्टम आहे.

Web Title: Maruti Alto K10 best car for middle class family; Mileage of 35 KM and price less than 4 lakhs....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.