Maruti Brezza CNG Launch होण्यापूर्वी जाणून घ्या, मायलेज, किंमत आणि फीचर्स... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:02 PM2022-11-15T15:02:18+5:302022-11-15T15:02:53+5:30

Maruti Brezza CNG : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) जुलै 2022 मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारूती ब्रेझा (Compact SUV Brezza) लाँच केली होती.

Maruti Brezza Cng Launch Soon Know Complete Details Of Expected Mileage Price Features And Variants | Maruti Brezza CNG Launch होण्यापूर्वी जाणून घ्या, मायलेज, किंमत आणि फीचर्स... 

Maruti Brezza CNG Launch होण्यापूर्वी जाणून घ्या, मायलेज, किंमत आणि फीचर्स... 

googlenewsNext

नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) लवकरच आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारूती ब्रेझाचे सीएनजी मॉडेल (Maruti Brezza CNG) बाजारात आणणार आहे. मारुती ब्रेझा सीएनजी लाँच झाल्यानंतर पेट्रोल, हायब्रीड आणि सीएनजी पर्याय ऑफर करणारी एसयूव्ही सेगमेंटमधील ती एकमेव कार ठरणार आहे.

मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) जुलै 2022 मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारूती ब्रेझा (Compact SUV Brezza) लाँच केली होती. या कारला मार्केटमध्ये मिळणार प्रतिसाद पाहता कंपनी मारुती ब्रेझा सीएनजी व्हेरिएंट (Maruti Brezza CNG Variant )सादर करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी ब्रेझा चार व्हेरिएंटमध्ये सीएनजी पर्यायासह ऑफर केली जाईल, ज्यात बेस मॉडेल LXI, अप्पर बेस मॉडेल VXI, टॉप एंड मॉडेल ZXI आणि टॉप मॉडेल ZXi+ यांचा समावेश आहे.

Maruti Brezza CNG Engine and Transmission
मारुती ब्रेझा सीएनजी इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी सध्याच्या मॉडेलमध्ये दिलेले 1.5 लीटर K15C इंजिन देणार आहे. हे इंजिन 102 Bhp ची कमाल पॉवर आणि 137 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. पण CNG किटमध्ये आल्यानंतर कारची पॉवर 87 bhp आणि पीक टॉर्क 121.5 Nm असू शकते. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर दिले जाऊ शकतात.

Maruti Brezza CNG Boot Space
मारुती ब्रेझा सीएनजी बूट स्पेसबद्दल बोलायचे झाले तर मारुती ब्रेझामध्ये सीएनजी सिलिंडर बसवल्यानंतर कारच्या बूट स्पेसमध्ये घट होणे निश्चित आहे, परंतु आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंनुसार सीएनजी सिलिंडर अशा प्रकारे बसविण्यात आले आहे, जे कमीत कमी बूट स्पेस व्यापेल.

Maruti Brezza CNG Mileage
याचबरोबर,मारुती ब्रेझा सीएनजीच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, ब्रेझा सीएनजीचे मायलेज 30 किमी प्रतिलिटर असणार आहे. मात्र, कंपनीकडून मायलेजबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

Maruti Brezza CNG Price
कंपनीने अद्याप लाँच किंमतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी 9.30 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच करू शकते.

Web Title: Maruti Brezza Cng Launch Soon Know Complete Details Of Expected Mileage Price Features And Variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.