सर्वांची 'बाप' ठरली Maruti ची ही स्वस्तातली SUV! Nexon, Creta, Punch सर्व बघतच राहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 14:22 IST2023-03-08T14:21:39+5:302023-03-08T14:22:35+5:30
टाटा नेक्सन नंबर-1 च्या पोझिशनवरून घसरली आहे. नेक्सन जानेवारी 2023 मध्ये टॉप सेलिंग एसयूव्ही ठरली होती.

सर्वांची 'बाप' ठरली Maruti ची ही स्वस्तातली SUV! Nexon, Creta, Punch सर्व बघतच राहिले
गेल्या काही दिवसांत एसयूव्ही वाहनांकडे ग्राहकांचा ओढा वाढताना दिसत आहे. यामुळे, एसयूव्ही वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. टाटा नेक्सन, टाटा पंच, ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ब्रेझा या टॉप 5 बेस्ट सेलिंग एसयूव्ही पैकी आहेत. बरेच महिने टाटा नेक्सन बेस्ट सेलिंग एसयूव्ही होती. मात्र 2023 च्या फेब्रुवारी महिन्यात असे झाले नाही. या महिन्यात मारुती ब्रेझा ही सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही ठरली. यामुळे टाटा नेक्सन नंबर-1 च्या पोझिशनवरून घसरली आहे. नेक्सन जानेवारी 2023 मध्ये टॉप सेलिंग एसयूव्ही ठरली होती.
फेब्रुवारी 2023 मध्ये मारुती सुझुकी ब्रेझाच्या 15,787 युनिट्सची विक्री झाली. जी एसयूव्ही सेगमेंटमध्ये कुठल्याही कार विक्रीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत हिची विक्री 70.56 टक्क्यांनी वाढली आहे. तेव्हा हिच्या एकूण 9,256 युनिट्सची विक्री झाली होती. तसेच इतर एसयूव्हीसंदर्भात बोलायचे झाल्यास फेब्रुवारी 2023 मध्ये नेक्सनचे 13,914 युनिट्स, पंचचे 11,169 युनिट्स आणि हु्युंदाई क्रेटाचे 10,421 युनिट्स विकले गेले आहेत.
महत्वाचे म्हणजे, 2022च्या फेब्रुवारी महिन्यात ब्रेझाचे ओल्ड जनरेशन मॉडेल विरले जात होते. मात्र आता हिचे न्यू जनरेशन मॉडेल विकले जात आहे. गेल्या वर्षी मारुती सुझुकीने ब्रेझाला जनरेशन अपडेट दिले होते. यानंतर हिच्या विक्रीत तेजी दिसून आली. अपडेट केल्यानंतर मारुतीने या कारमध्ये बरेच नवे फीचर्स दिले होते. यात सनरूफचाही समावेश आहे.