SUV ची मजा अन् CNG चं मायलेज! लवकरच येताहेत 'या' जबरदस्त कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:36 PM2022-11-25T12:36:39+5:302022-11-25T12:38:22+5:30
पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी कार अतिशय किफायतशीर मानल्या जातात.
पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी कार अतिशय किफायतशीर मानल्या जातात. ज्यामुळे बाजारात सीएनजी कारची मागणी देखील प्रचंड आहे. याच कारणामुळे आता कार निर्मात्या कंपन्या कंपनी फिटेड सीएनजी कार आणण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. येत्या काळात अनेक शानदार कारचं सीएनजी व्हर्जन लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. यात काही एसयूव्ही सेगमेंट कार देखील आहेत की ज्या सीएनजी मॉडलमध्ये लॉन्च केल्या जातील. त्यामुळे ग्राहकांना सीएनजीच्या दरात एसयूव्हीवाला फिल मिळणार आहे.
Maruti Brezza CNG: मीडिया रिपोर्ट्सनुसार मारुती सुझूकी लवकरच आपल्या ब्रेजा एसयूव्ही कारला सीएनजी व्हेरिअंटमध्ये सादर करणार आहे. तसंच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणारी ही पहिलीच सीएनजी कार ठरणार आहे. कंपनीकडून ही कार एकूण ७ व्हेरिअंटमध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे. यात १.५ लीटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार आहे. जे 87bhp पावर आणि 112Nm टॉर्क जनरेट करू शकते. दरम्यान, या कारच्या लॉन्चबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Toyota Hyryder CNG: टोयोटानं नुकतीच अर्बन क्रूझर हायरायडरच्या सीएनजी व्हेरिअंट लॉन्चिंगबाबत अधिकृत माहिती दिली आहे. देशातील ही पहिली मिड साइज एसयूव्ही असणार आहे की जी सीएनजी व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली जाईल. कंपनीनं या कारमध्ये १.५ लीटर क्षमतेचं K15C पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. हेच इंजिन ग्रँड विटारामध्येही वापरण्यात आलं आहे.
Tata Nexon CNG: टाटा नेस्कॉन सब-फोअर मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वात सुरक्षित कार मानली जाते. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या एसयूव्हीला फाइव्ह-स्टार रेटिंग मिळालं आहे. या पावरफूल कारला बाजारात १.२ लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर टर्बो डिझल इंजिनसह लॉन्च करण्यात आलं होतं. आता टाटा मोटर्स आपल्या सीएनजी पोर्टफोलिओला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच याअंतर्गत टाटानं टियागो आणि टिगोर कार सीएनजी मॉडल लॉन्च केलं गेलं होतं. आता टाटा नेक्सॉन देखील सीएनजी व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे.
Tata Punch CNG: टाटा पंच ही कंपनीची देशातील सर्वात पहिली मायक्रो-साइज एसयूव्ही कार म्हणून मानली जाते. कंपनीद्वारे आता ही कार सीएनजी व्हेरिअंटमध्ये सादर केली जाऊ शकते. या कारमध्ये १.२ लीटर नॅचरल अस्पायर्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. यात एकूण ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सची सुविधा मिळते. रिपोर्टनुसार ही एसयूव्ही सीएनजी व्हेरिअंटमध्ये घोषणा