Maruti Celerio CNG Price, Mileage: बाबो! एका किलोला ३५.६० किमीचे मायलेज; मारुती सेलेरियो सीएनजी लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:03 PM2022-01-18T15:03:20+5:302022-01-18T15:04:07+5:30

Maruti Celerio CNG launched उद्या टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. टिगोर सीएनजी 3 व्हेरिएंटमध्ये आणली जाणार आहे. त्याआधीच मारुतीने सीएनजी कार लाँच केली आहे.

Maruti Celerio CNG launched Price 6.58 lakhs, Mileage of 35.60 km per kg | Maruti Celerio CNG Price, Mileage: बाबो! एका किलोला ३५.६० किमीचे मायलेज; मारुती सेलेरियो सीएनजी लाँच

Maruti Celerio CNG Price, Mileage: बाबो! एका किलोला ३५.६० किमीचे मायलेज; मारुती सेलेरियो सीएनजी लाँच

googlenewsNext

देशातील सर्वाधिक मायलेजची कार मारुती सेलेरियोचा सीएनजी व्हेरिअंट लाँच करण्यात आला आहे. Maruti Suzuki Celerio S-CNG चे सीएनजीमधील मायलेजही खतरनाक आहे. एका किलोला ३५.६० किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सेलेरियो ही मारुतीची सहावी सीएनी कार आहे. 

भारतीय बाजारात सेलेरियोची किंमत 6.58 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. ही सीएनजी कार VXi व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत ही कार 45,000 रुपयांनी महाग आहे. यामध्ये K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 
मारुती सुजुकी सेलेरियो S-CNG मध्ये बसविण्यात आलेले इंजिन 5300 आरपीएम वर 41.7kW ची ताकद निर्माण करते. पेट्रोलचे इंजिन 5500 आरपीएमवर 48.0kW एवढी ताकद निर्माण करते. Maruti Suzuki Celerio मध्ये 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स मिळतो. सीएनजीसाठी ६० किलोची टाकी देण्यात आली आहे. 

उद्या टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. टिगोर सीएनजी 3 व्हेरिएंटमध्ये आणली जाणार आहे. दरम्यान, फोटोमध्ये कारचे डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखेच असल्याचे दिसते. हे कारचे खालचे वेरिएंट आहे, ज्याला 15-इंच अलॉय व्हील आणि i-CNG बॅज देण्यात आला आहे.  टाटा टियागो आणि टाटा टिगोरचे सीएनएक्स मॉडेल्स आता अधिक किमतीचे असणार आहेत. या दोन्ही कारचे बुकिंगही अनधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे आणि शहर आणि डीलरशीपनुसार 5,000 आणि 11,000 रुपयांमध्ये दोन्ही सीएनजी मॉडेल्सची बुकिंग करता येईल.

Web Title: Maruti Celerio CNG launched Price 6.58 lakhs, Mileage of 35.60 km per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.