TATA, Maruti Car Launch: घाई महागात पडेल! पुढील महिन्यात या चार कार लाँच होणार; दोन खिशाला परवडणाऱ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 16:41 IST2021-10-23T16:40:52+5:302021-10-23T16:41:18+5:30
Upcomming Cars in Next month: कार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी पुढील महिना म्हणजेच नोव्हेंबर 2021 हा एक्सायटिंग असणार आहे. टाटाने गेल्याच आठवड्यात जोरदार पंच दिला आहे. आता पुन्हा एक फोरस्टार रेटिंगची कार लाँच करणार आहे.

TATA, Maruti Car Launch: घाई महागात पडेल! पुढील महिन्यात या चार कार लाँच होणार; दोन खिशाला परवडणाऱ्या...
भारत ही जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ आहे. जगातील प्रख्यात ब्रँड भारतात व्यवसाय करतात. काही अमेरिकी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घ्यावा लागला असला तरीदेखील ज्या कंपन्या आहेत त्या आपले पाय मजबूतीने रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सतत त्यांची मॉडेल अपडेट करत असतात. यामुळे ग्राहकांसमोर कार निवडण्याचा पेच निर्माण होत आहे.
कार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी पुढील महिना म्हणजेच नोव्हेंबर 2021 हा एक्सायटिंग असणार आहे. टाटाने गेल्याच आठवड्यात जोरदार पंच दिला आहे. आता पुन्हा एक फोरस्टार रेटिंगची कार लाँच करणार आहे. पुढील महिन्यात मारुती सुझुकी Maruti Celerio, Tata Tiago CNG लाँच होणार आहेत.
मारुतीने सेलेरियो कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. येत्या 10 नोव्हेंबरला ही कार लाँच केली आहे. याच दिवशी या कारची किंमतही सांगितली जाईल. नवीन सेलेरियो ही आधीपेक्षा मोठी आणि अपमार्केट असेल.
टाटाने टियागो सीएनजी कारचे बुकिंग सुरु केले आहे. ही कार देखील नोव्हेंबर 2021 मध्ये लाँच केली जाईल. लाँचवेळीच त्याची किंमत जाहीर केली जाईल. CNG व्हेरिअंट पेट्रोल कारपेक्षा 50 चे 60 हजार रुपयांनी महाग असेल.
ऑडी क्यू५
ऑडीने क्यू५ फेसलिफ्ट भारतात लाँच करण्याचे ठरविले असून प्री-बुकिंग सुरु केले आहे. या कारची 2 लाख रुपये देऊन बुकिंग केली जाऊ शकते. ही कार पाच रंगांत उपलब्ध होणार आहे.
फोक्सवॅगन टिग्वान
ही कार लाँच करण्यासाठी तुम्हाला पुढील महिन्याची वाट पहावी लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये ही कार कंपनी बाजारात आणेल. या कारच्या अपडेटेड मॉडेलमध्ये अनेक बदल पहायला मिळतील.