मारुतीच्या 3 हजार कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी; आणखी काही क्षेत्रे मंदीच्या प्रभावाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:00 PM2019-08-17T16:00:12+5:302019-08-17T16:04:52+5:30

मंदीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही.

Maruti cuts 3,000 employees from work; Some other areas are under the effects of the recession | मारुतीच्या 3 हजार कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी; आणखी काही क्षेत्रे मंदीच्या प्रभावाखाली

मारुतीच्या 3 हजार कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी; आणखी काही क्षेत्रे मंदीच्या प्रभावाखाली

googlenewsNext

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मंदीचा मोठा फटका बसला आहे. दोन दशकांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने पहिल्यांदाच मंदीचा सामना केला आहे. याआधी 2000 मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मंदाचा फटका बसला होता. यामुळे Maruti Suzuki ने 3 हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. 


मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले की, मंदीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. सध्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही. काही खासगी वृत्तवाहिन्यांना त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, हा व्यवसायाचा एक भाग आहे. जेव्हा मागणी वाढते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाते. जेव्हा मागमी घटते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाते. 


भार्गव यांना मारुती सुझुकीने केलेल्या कामगार कपातीवर प्रश्न करण्यात आला होता. यावेळी त्यांनी होकार देत तीन हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्याचे सांगितले. ऑटोमोबाईल सेक्टर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण करतो. विक्री, सेवा, इन्शुरन्स, लायसन्स, फायनान्स, अॅक्सेसरीज, ड्रायव्हर, पेट्रोल पंप आणि ट्रान्सपोर्टेशन यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या प्रभावित असणार आहेत. कल्पने पलिकडे या क्षेत्राला मोठा फटका बसणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 


यंदा तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीमध्ये काही सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो. 2021 मध्ये काही बदलही दिसण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे ग्रामीण भागात कार विक्री वाढू शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Maruti cuts 3,000 employees from work; Some other areas are under the effects of the recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.