Electric Kit For Maruti Dzire: तुमच्याकडे Maruti Dzire आहे का? Electric Kit लाँच, 240 किमी रेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:37 AM2021-08-24T11:37:37+5:302021-08-24T11:39:02+5:30
Electric Kit For Maruti Dzire: ईव्ही किट निर्माता कंपनीच्या दाव्यानुसार हे किट प्लग अँड प्ले किट आहे. हे किट वापरण्यासाठी फक्त पेट्रोल इंजिन हटवावे लागणार आहे. बाकी पार्ट तसेच ठेवता येणार आहेत.
देशात इलेक्ट्रीक वाहने लाँच होत आहेत. यामध्ये टाटा कंपनी अग्रेसर आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती खूपच मागे राहिलेली असली तरी देखील मारुतीची डिझायर कार असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमची जुनी कार ईलेक्ट्रीकमध्ये कन्व्हर्ट करता येणार आहे. याचे किट पुण्याच्या Northway Motorsport ने लाँच केले आहे. (Pune based Northway Motorsport has officially launched their EV conversion kit for Maruti Dzire and Tata Ace.)
ईव्ही किट निर्माता कंपनीच्या दाव्यानुसार हे किट प्लग अँड प्ले किट आहे. हे किट वापरण्यासाठी फक्त पेट्रोल इंजिन हटवावे लागणार आहे. बाकी पार्ट तसेच ठेवता येणार आहेत. हे किट पेट्रोल इंजिनचेच माऊंटिंग वापरते. कंपनीने मारुती डिझायरसाठी दोन किट लाँच केली आहेत. ड्राईव्ह ईझेड आणि ट्रॅव्हल ईझेड अशी या किटची नावे आहेत. ही किट अनुक्रमे 120 किमी आणि 250 किमीची रेंज देतात.
Drive EZ ला 5-6 तासांचा चार्जिंग टाईम लागतो. Travel EZ ला चार्ज होण्यासाठी 8-10 तास लागतात. Drive EZ या किटचे बुकिंग 25000 रुपयांना करता येणार आहे. व्यावसायिक वापराच्या वाहनांसाठी 80 किमी प्रति तासाचा वेग आणि खासगी वाहनांसाठी 40 किमी प्रति तासाचा वेग देण्यात आला आहे. या कन्व्हर्जन किटची किंमत 4.50 ते 5 लाखांच्या आसपास असणार आहे.
Tata Ace साठी देखील कंपनीने इलेक्ट्रीक किट तयार केले आहे. Northway कंपनी राज्यभरात सर्व्हिस सेंटर उभारणार आहे. तसेच डीलर आणि चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. हे काम येत्या 4-5 महिन्यांत केले जाणार आहे. मात्र, या वाहनांना मारुती किंवा टाटा स्पेअर पार्ट, सेवा देणार की नाही हे पहावे लागणार आहे. याचबरोबर ईव्ही वाहनांची करमाफी, टोल माफी आदी सूट मिळेल का हे देखील पहावे लागणार आहे.
वेग वाढला... (Maruti Suzuki Dzire EV Range)
मारुती डिझायरची पेट्रोल व्हर्जनची कार 0 ते 100 किमीचा वेग 12 सेकंदात गाठते. मात्र, ईव्ही १० सेकंदात. ईव्हीचे इंजिन सेटअप हा नेक्सॉनच्या सेटअपपेक्षा छोटा आहे. मात्र, टॉप स्पीड हा 140 किमी प्रति तास आहे. तर नेक्सॉन ईव्हीचा टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे. या रेसमध्ये ही डिझायर टाटा नेक्सॉन ईव्हीला (nexon EV) मागे टाकते. बॅटरी ही कारच्या आतमध्ये किंवा बॉनेटमध्ये ठेवता येत असल्याने डिक्की वाया जात नाही. जे किट या डिझायरमध्ये वापरण्यात आले आहे, ते टेस्टिंगसाठी मान्यता मिळविलेले आहे. व्यापारासाठी अद्याप मान्यता मिळायची आहे.