मारुतीला टाटा पंचचा जबरदस्त तोड मिळाला! पहिल्या १० टॉप सेलिंगमधून बाहेर फेकले, पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 11:40 AM2023-08-07T11:40:01+5:302023-08-07T11:41:25+5:30
टाटा पंच ही पहिल्या टॉप १० सेलिंग कारमध्ये लाँच झालेली तेव्हापासून होती. मारुतीने या सेगमेंटमध्ये टक्कर देण्यासाठी मारुती फ्राँक्स लाँच केली आहे.
गेल्या वर्षभरापासून टाटाच्याच नाही तर एकूणच टॉप सेलिंग कारमध्ये राहणाऱ्या टाटा पंचला मारुतीने चांगलाच पंच दिला आहे. जुलैमध्ये झालेल्या विक्रीत टाटा पंचला पहिल्या १० कारमध्ये देखील जागा मिळालेली नाहीय. याचाच अर्थ मारुतीला टाटा पंचला देखील तोड मिळाला आहे.
टाटा पंच ही पहिल्या टॉप १० सेलिंग कारमध्ये लाँच झालेली तेव्हापासून होती. मारुतीने या सेगमेंटमध्ये टक्कर देण्यासाठी मारुती फ्राँक्स लाँच केली आहे. या मिड साईज एसयुव्हीला टाटा पंचला टक्कर देण्यासाठी वेळ लागला, परंतू अवघ्या दोन-तीन महिन्यांतच तिने टाटा पंचला पर्याय देत ग्राहकसंख्या खेचून आणली आहे. यामुळे सहाजिकच टाटा पंचची विक्री कमी झाली आणि ती पहिल्या दहा मधून बाहेर फेकली गेली आहे.
टाटा पंचची आणखीन हालत पस्त होण्याची शक्यता आहे. कारण ह्युंदाईने एक्स्टरही पंचला टक्कर देणारी कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार आणली आहे. ती सीएनजीमध्ये देखील आहे. यामुळे या सेगमेंटमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळणार आहे. पंच आणि एक्स्टरमधील टक्करचा फायदा मारुतीला होणार आहे हे मात्र नक्की आहे.
फ्राँक्सची जुलैमधील विक्री ही 13,220 युनिट्स राहिली आहे. तर तीने दहा कारमध्ये सातवा क्रमांक पटकावला आहे. पंचच्या 12,019 युनिट्सची विक्री झाली आहे. ती आता आठवरून अकराव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. जूनमध्ये पंचची विक्री 10,990 युनिट्स होती.
फ्राँक्सची 7.46 लाख ते 13.13 लाख रुपये किंमत आहे. ही 5 सीटर एसयूव्ही 12 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मारुती फ्रँक्सचे मायलेज 22.89 kmpl ते 28.51 km/kg पेट्रोल तसेच CNG पर्यायामध्ये आहे. टाटा पंच, प्युअर, अॅडव्हेंचर, अॅक्प्लिश्ड आणि क्रिएटिव्ह अशा ट्रिम स्तरांवर 33 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 6 लाख ते 10.10 लाख रुपयांपर्यंत आहे.