Maruti नं लाँच केली नवी CNG कार, ३२ किमीचं मायलेज आणि फीचर्सही कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 04:06 PM2022-10-15T16:06:38+5:302022-10-15T16:07:02+5:30

उत्तम फीचर्ससह ही कार लाँच करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणती आहे ही कार आणि किती आहे किंमत.

Maruti has launched a new CNG car mileage of 32 km and features are also maximum mini suv s presso | Maruti नं लाँच केली नवी CNG कार, ३२ किमीचं मायलेज आणि फीचर्सही कमाल

Maruti नं लाँच केली नवी CNG कार, ३२ किमीचं मायलेज आणि फीचर्सही कमाल

Next

बाजारपेठेत सध्या सीएनजी कारचे वर्चस्व कायम आहे. अशा परिस्थितीत भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह ब्रँड मारुती सुझुकीने आणखी एक सीएनजी कार अत्यंत कमी किमतीत लाँच केली आहे. मारुती सुझुकीने त्यांच्या मायक्रो एसयूव्ही एस-प्रेसो, मारुती एस-प्रेसोचं नवं व्हर्जन Maruti S-Presso S CNG लाँच केली आहे. मारुती सुझुकीचा दावा आहे की ही कार सीएनजीवर 32.73 किमी प्रति किलो मायलेज देईल. त्याला ARAI कडूनही प्रमाणित करण्यात आले आहे.

Maruti S Presso S CNG मध्ये कंपनीने 1.0 लीटर ड्युअल जेट, ड्युअल VVT नेक्स्ट जनरेशन के सीरिज इंजिन दिले आहे. S-Presso S-CNG इंजिन 5,300 RPM वर 41.7kW (56.69 PS) चे पीक पॉवर आउटपुट आणि CNG मोडमध्ये 3,400 RPM वर 82.1Nm कमाल टॉर्क जनरेट करते. पेट्रोलवर चालणारे, हे इंजिन 5,500 rpm वर 65.26 PS पीक पॉवर आणि 3,500 rpm वर 89 Nm टॉर्क निर्माण करते. S-Presso 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच 5-स्पीड AMT सह उपलब्ध आहे. मारुती एस-प्रेसो एस-सीएनजी 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार्य करते.

जबरदस्त फीचर्स
मारुतीने या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेच्या कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. यासोबतच कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो, कीलेस एंट्री, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट, EBD सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किती आहे किंमत?
केवळ S-Presso LXi S-CNG आणि VXi S-CNG व्हेरिअंटमध्ये CNG देण्यात येत आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, LXi S-CNG व्हेरिएंटची किंमत 5.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच वेळी, VXi S-CNG व्हेरिअंटची किंमत 6.10 लाख (एक्स-शोरूम) आहे. मारुती सुझुकीकडे सध्या 10 S-CNG मॉडेल्स आहेत.

Web Title: Maruti has launched a new CNG car mileage of 32 km and features are also maximum mini suv s presso

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.