Maruti कार स्वस्तात विकत घेण्याची शेवटची संधी, पुढच्या महिन्यात वाढणार किंमती!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 05:56 PM2021-06-22T17:56:38+5:302021-06-22T17:58:10+5:30
Maruti Suzuki : कंपनी आपल्या मॉडेल्सच्या किमतीत यावर्षी तिसऱ्यांदा वाढ करत आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने आपल्या कार 34,000 रुपयांपर्यंत महाग केल्या होत्या.
नवी दिल्ली - देशातील सर्वात प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या कारच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या कारच्या किंमती या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वाढविणार आहे. अर्थात जुलैपासून कंपनीच्या कार महाग होणार आहेत. (Maruti to hike price of its cars for third time in this year)
...म्हणून महाग होणार मारुतीच्या कार -
कंपनीने कारच्या किंमती वाढविण्याचे कारण इनपुट कॉस्टमध्ये झालेली वाढ सांगितले आहे. इनपुट कॉस्ट वाढल्याने कारच्या किंमतीही वाढतील. यामुळे कार महाग होतील. कारच्या किंमतीत कुठल्याही प्रकारची निश्चित वाढ करण्यात आलेली नाही. वाढलेली किंमत प्रत्येक मॉडेलसाठी वेगवेगळी असेल. मात्र, कंपनी आपल्या कारच्या किंमतीत नेमकी किती वाढ करणार, यासंदर्भात अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही.
दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाली Hyundai Alcazar SUV; पाहा किती आहे किंमत
याच वर्षात तिसऱ्यांदा वाढतेय किंमत -
कंपनी आपल्या मॉडेल्सच्या किमतीत यावर्षी तिसऱ्यांदा वाढ करत आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने आपल्या कार 34,000 रुपयांपर्यंत महाग केल्या होत्या. यानंतर एप्रिलमध्येही कंपनीने काही कारच्या किंमती वाढविल्या होत्या. आता तिसऱ्यांदा कंपनी आपल्या कारच्या किंमती वाढवत आहे.
सध्या कंपनीच्या ARENA आणि NEXA चे 15 मॉडेल शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कंपनीचे अल्टो हे सर्वात स्वस्त मॉडेल आहे. याची किंमत 3 लाख ते 4.60 लाख रुपयांदरम्यान आहे. याचबरोबर कंपनीची फ्लॅगशिप कार मारुती सुझुकी एस-क्रॉसची किंमत 8.39 लाख ते 12.39 लाख रुपये आहे.
Photo : जगातील सर्वात महागड्या कारचे लाँचिंग; एवढ्या किंमतीत उभा राहिलाय शाहरुख खानचा 'मन्नत'!