मारुतीने लाँच केली सीएनजीवर चालणारी अल्टो; पाहा किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:43 PM2019-06-14T19:43:33+5:302019-06-14T20:13:47+5:30
सीएनजीचे दोन व्हेरिअंट LXi आणि LXi (O) बाजारात लाँच केले आहेत.
नवी दिल्ली : बीएस 6 नियमावली पुढील वर्षी लागू होणार आहे. यामुळे देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी मारुती सुझुकीसह अन्य कंपन्या नवीन तंत्रज्ञानाच्या कार बाजारात आणत आहेत. मारुतीने त्यांची लोकप्रिय कार अल्टो दोन महिन्यांपूर्वीच नव्या सुरक्षा प्रणालीसह लाँच केली होती. आज मारुतीने सीएनजी व्हेरिअंट लाँच केली आहे.
मारुतीच्या या छोट्या कारची किंमत 4.11 लाख रुपयांपासून सुरु होते. सीएनजीचे दोन व्हेरिअंट LXi आणि LXi (O) बाजारात लाँच केले आहेत. दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 4.14 लाख रुपये एक्स शोरूम आहे. दोन्ही मॉडेल पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा 60 हजार रुपयांनी महाग आहेत.
मारुती सुझुकीने सीएनजी कारची अधिक माहिती दिलेली नसली तरीही पेट्रोल मॉडेलपेक्षा वेगळी असणार नाही. दोन्ही कारमध्ये पावर स्टेअरिंग, एसी, फ्रंट पावर विंडो, सिल्व्हर इंटिरिअर एक्सेंट, रिअर सीटबेल्ट, चाईल्ड लॉक, रिमोट बूट आदी बाबी मिळणार आहेत. तर LXi (O) मध्ये चालका शेजारील प्रवाशासाठी एअरबॅग देण्यात येणार आहे.
नवीन अल्टोमध्ये कंपनीने सुरक्षा नियम, उत्सर्जन आणि क्रॅश टेस्ट अनुरुप बदल करण्यात आले आहेत. यामध्ये 796cc चे इंजिन देण्यात आले असून 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन देण्यात आले आहे. नवी अल्टो 2.94 लाख रुपयांपासून सुरु होते. रेनॉल्ट क्वीड, रेडी गो सारख्या कार अल्टोच्या प्रतिस्पर्धी आहेत.