भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार नवी Maruti Baleno; देण्यात आले आहेत लक्झरी फीचर्स, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 03:05 PM2022-02-23T15:05:03+5:302022-02-23T15:07:27+5:30
दिसण्याच्या दृष्टीने, नवीन बलेनो पूर्णपणे नव्या अवतारात आली आहे. महत्वाचे म्हणजे यात कंपनीने अनेक नवे फीचर्स दिले आहेत.
नवी दिल्ली - मारुती सुझुकीने भारतीय ग्राहकांच्या आवडीची प्रीमियम हॅचबॅक 2022 Baleno लॉन्च केली आहे. हिची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.35 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये एवढी आहे. 2022 मधील मारुती सुझुकीची ही पहिली कार आहे जी सर्वात महत्त्वाच्या लॉन्चपैकी एक आहे.
दिसण्याच्या दृष्टीने, नवीन बलेनो पूर्णपणे नव्या अवतारात आली आहे. महत्वाचे म्हणजे यात कंपनीने अनेक नवे फीचर्स दिले आहेत. येथे ग्राहकांना सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेले अनेक फीचर्स मिळतील. कारच्या केबिन आणि एक्सटीरियरमध्येहीही मोठे बदल करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही ही कार पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे.
एक्सटीरियर आणि इंटीरियर दोन्हीमध्येही बदल -
मारुती सुझुकीने नवीन बलेनोच्या एक्सटीरियर आणि इंटीरियर दोन्हींमध्ये मोठे बदल करून कारला एक फ्रेश लूक दिला आहे. बाह्य भागाला क्रोम गार्निश, दुसऱ्या डिझाइनचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहे. तसेच साइड मिरर्सवर लावण्यात आलेले इंडिकेटर्स आणि क्रोम हँडल्स जुण्या मॉडेल्समधून घेण्यात आले आहे. कारचा मागील भाग पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाला आहे. कारण टेललाइट्स आता खूपच स्लिम झाले आहेत. त्यांना एल-आकाराचे डिझाइन देण्यात आले आहे आणि ते नवीन एलईडी सिग्निचरसह आले आहेत. ही कार दिसायला अत्यंत आकर्षक असून ग्राहकांना नक्कीच आवडेल.
लक्झरी कार्स सारखे फीचर्स आणि जबरदस्त सेफ्टी -
2022 मारुती सुझुकी बलेनोसह उत्कृष्ट आणि हाय-टेक फीचर्सची संपूर्ण यादी देण्यात आली आहे. यात हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा, 9-इंचाचा स्मार्टप्ले, प्रो प्लस सिस्टमसह आर्किमीज ट्यूनिंग देण्यात आले आहे. याशिवाय, बलेनोत केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे, नवीन पिढीचे सुझुकी कनेक्ट अॅप हे 40 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स उपलब्ध करून देते. हे कनेक्टेड फीचर्स इंटरनेवर चालते. यात अॅमेझॉन अॅलेक्साचा समावेश आहे. या शिवाय या कारमध्ये 6 एअरबॅग्स आणि 20 हून अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
भारतीय बाजारात 2022 बलेनोचा सामना थेट Hyundai i20, TATA Altroz, Honda Jazz आणि Volkswagen Polo सोबत आहे.