याला म्हणतात मायलेज! मुंबई-पुणे ४ वेळा जाऊन याल; ‘या’ कारसमोर बाकी सपशेल फेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 04:25 PM2022-06-06T16:25:40+5:302022-06-06T16:29:02+5:30
भारतीय बाजारात सर्वाधिक मायलेज क्लेम करणारी स्वस्तात मस्त कार म्हणून या कारकडे पाहिले जाते.
नवी दिल्ली: आताच्या घडीला देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय असलेल्या सीएनजीच्या किमतीही वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रिक कारचा आणखी तिसरा पर्याय असला, तरी अद्याप सहज इलेक्ट्रिक कार घेण्यासारखी परिस्थिती नाही. उलट, देशावर वीज संकट असल्याचे बोलले जात आहे. अशातच नेमकी कोणती कार घ्यावी, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात येतोच. मात्र, मारुतीने अलीकडेच एक भन्नाट कार सादर केली असून, या कारचे मायलेज एवढे जबदस्त आहे की, एकदा टाकी फुल्ल केलीत की, ४ वेळा मुंबई-पुणे प्रवास करू शकाल, असा मोठा दावा केला जात आहे.
भारतीय बाजारात चांगल्या मायलेज देणाऱ्या अनेकविध कार आताच्या घडीला उपलब्ध आहेत. मात्र, सध्या भारतीय बाजारात सर्वाधिक मायलेज क्लेम करणारी स्वस्तात मस्त कार मारुती सुझुकी कंपनीने सादर केली आहे. त्या कारचे नाव मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio). कंपनीनुसार, ही कार एक लीटर पेट्रोलवर २६.६८ किलोमीटर पर्यंतचं मायलेज देते. तसेच या कारचं सीएनजी व्हेरिएंट ३५.६० किमी इतकं मायलेज देते. या कारचं सीएनजी व्हेरिएंट सर्वात जास्त मायलेज देते. या कारची एक्स शोरूम किंमत ५.२५ लाख रुपये इतकी आहे.
एकदा टाकी फुल करा अन् प्रवासाचा आनंद घ्या
मारुती सेलेरियो या कारमध्ये ३२ लीटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. म्हणजेच २६.६८ किमी प्रति लीटर या मायलेजनुसार या कारची टाकी फुल केल्यानंतर ही कार तब्बल ८५३ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. मुंबई ते पुणे या दोन शहरांमधील अंतर साधारण १७५ ते २०० किलोमीटर इतके आहे. म्हणजे तुम्ही तीन ते चारवेळा सहज मुंबई-पुणे प्रवास करू शकाल, असा दावा करण्यात आला आहे.
कारमध्ये उत्तमोत्तम फिचर्स
मारुतीची सेलेरियोमध्ये K10C DualJet 1.0-लीटर थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्सचा ऑप्शन देण्यात येतो. कंपनीचा दावा आहे की, ही कार २६.६८ किमी प्रति लीटर इतके मायलेज देते. या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट (फर्स्ट-इन सेगमेंट) असे एकूण १२ सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यात फ्रंटल-ऑफसेट, साइड क्रॅश यांसारख्या सर्व भारतीय सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले आहे. ही कार एकूण ६ रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे.