Maruti Suzuki Alto: मारुतीच्या सर्वात स्वस्त कारवर मोठा डिस्काऊंट; कमी किंमतीत ALTO खरेदीची शेवटची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 09:02 AM2022-01-27T09:02:39+5:302022-01-27T09:03:06+5:30
Maruti Suzuki Alto discount and Offers: मारुती सुझुकी अल्टोची विक्री गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झाली आहे. आजवर कंपनीने मारुती ८०० व अल्टोच्या जवळपास ३० लाखांहून अधिक कार विकल्या आहेत. यामुळे पुन्हा या कारला सर्वाधिक खपाची कार बनविण्यासाठी मारुतीने जानेवारीपासूनच तगडी सूट देण्यास सुरुवात केली आहे.
देशात गेल्या अनेक वर्षांपासून भल्या भल्या कंपन्या आल्या, परंतू मारुतीची जागा कोणी घेऊ शकले नाही. कारण मारुतीने लाखा लाखाच्या फरकाने लोकांसमोर एवढे पर्याय ठेवले की कमी मेन्टेनन्समध्ये याच कार लोकांच्या गळ्यातील ताईत झाल्या आहेत. मारुतीवर लोक डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतात. मारुतीची कोणतीही कार असे ती पाण्यासारखी विकली जाते. अशीच एक कार मारुतीने सामान्य लोकांसाठी बनविली होती मारुती ८००. आज ही कार जरी बाजारात नसली तरी तिची पुढची पिढी मारुती अल्टो आहे. याच कारवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे.
मारुती सुझुकी अल्टोची विक्री गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झाली आहे. आजवर कंपनीने मारुती ८०० व अल्टोच्या जवळपास ३० लाखांहून अधिक कार विकल्या आहेत. यामुळे पुन्हा या कारला सर्वाधिक खपाची कार बनविण्यासाठी मारुतीने जानेवारीपासूनच तगडी सूट देण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी २०२२ मध्ये या कारवर ३३००० रुपयांचा मोठा डिस्काऊंट देण्यात आला आहे.
यामध्ये १५००० रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि १८००० रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस आणि कार्पोरेट डिस्काऊंट देण्यात येत आहे. ही ऑफर ३१ जानेवारीपर्यंत असणार आहे. मारुती सुझुकीची ही कार २२.०५ किमीचे मायलेज देते. तर सीएनजी व्हेरिअंट ३१.५९ किमी/किग्राचे मायलेज देते.
मारुती सुझुकी अल्टोची किंमत ३.१५ लाखांपासून सुरु होते. सीएनजी मॉडेलची सुरुवात ४.७४ लाखांपासून होते. या कारमध्ये किलेस एन्ट्री, डुअल-फ्रंट एयरबैग्स, मोबाइल डॉक, ABS, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिपमीटर, डिजिटल ओडोमीटर, डुअल टोन डैशबोर्ड, एडजस्टेबल हेडलाइट सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. अल्टोचे 796 CC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.