Maruti Suzuki : मारुती ऑल्टो Tour H1 व्हेरिअंट लाँच; किंमत कमी, ३४ किमीपेक्षा जास्त मायलेज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 05:44 PM2023-06-10T17:44:54+5:302023-06-10T17:45:21+5:30
पाहा काय आहे या कारमध्ये खास, जाणून घ्या किंमत
मारुती सुझुकीने आता आपल्या कमर्शिअल पोर्टफोलिओमध्ये अल्टोचा समावेश केला आहे. कंपनीने अल्टोचे Tour H1 व्हेरिअंट लाँच केले आहे. कमर्शिअल सेगमेंट मॉडेल BS6 सह येते. यात एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससह ड्रायव्हर आणि पुढील प्रवाशांसाठी एअरबॅगची सुरक्षा देखील मिळते. अल्टो Tour H1 1L 5MT पेट्रोल व्हेरिअंटची सुरुवातीची 480,500 रुपये एक्स शोरुम आहे. त्याच वेळी, या कारच्या CNG व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 570,500 रुपये आहे. तुम्ही मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्रॅनाइट ग्रे आणि आर्क्टिक व्हाइट या तीन कलर व्हेरिअंटमध्ये ही कार खरेदी करू शकता.
मारुती सुझुकीकडे हॅचबॅक, सेडान आणि मल्टी युटिलिटी व्हेईकलसह (MPV) टूर व्हेरियंटसह सर्व विभागातील कार आहेत. सर्व-नवीन एंट्री-लेव्हल कमर्शिअल हॅचबॅक नेक्स्ट जनरेशन K-Series 1.0-लिटर ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिनसह येतात. दरम्यान, या कार यापूर्वी पेक्षा अधिक मायलेज देण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया कंपनीकडून देण्यात आली.
ऑल न्यू टूर H1 हॅचबॅक पेट्रोल व्हेरिअंट 66.6Ps आणि CNG व्हेरिअंटमध्ये 56.6Ps ची पॉवर जनरेट करते. त्याचे टॉर्क आउटपुट पेट्रोल मोडमध्ये 89Nm आणि CNG मोडमध्ये 82.1Nm पर्यंत असेल. टूर H1 पेट्रोल मोडमध्ये 24.60 km/l आणि S-CNG व्हेरिअंटमध्ये 34.46 km/kg चं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
काय आहेत सेफ्टी फीचर्स?
टूर H1 च्या सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात ड्युअल एअरबॅग्ज, प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिटरसह फ्रंट सीट बेल्ट, पुढच्या आणि मागील दोन्ही प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, इंजिन इमोबिलायझर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशनसह (EBD) अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलेय. याशिवाय स्पीड लिमिटिंग सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्सही यामध्ये देण्यात आलेत.