Maruti Suzuki : मारुतीच्या अर्टिगा, स्विफ्ट, डिझायर, सियाझ व XL6 च्या इंजिनामध्ये समस्या; तपासणीसाठी बोलविल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 01:04 PM2021-11-29T13:04:46+5:302021-11-29T13:12:18+5:30
Maruti Suzuki cars Engine Faulty: हजारो ग्राहकांनी मारुती सुझुकीकडे इंजिनबाबत तक्रारी केल्या आहेत. यामुळे मारुतीने आपल्या ग्राहकांना ही समस्या जाणवत असेल तर कार सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन येण्यास सांगितले आहे.
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या काही वाहनांसाठी विशेष सर्व्हिस कॅम्पेन राबविण्याची घोषणा केली आहे. जर तुमच्याकडे मारुती सुझुकीची अर्टिगा, स्विफ्ट, डिझायर, सियाझ आणि XL6 पैकी कोणतीही कार असेलल, तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
काही ग्राहकांना त्यांच्या कारच्या इंजिनांमध्ये असामान्य कंपनांचा (व्हायब्रेशन) सामना करावा लागत आहे. या पाच कार घेतलेल्या ग्राहकांनी कंपनीकडे याची तक्रार मोठ्या प्रमाणावर नोंदविली आहे. यामुळे कंपनीने या वाहनांच्या दुरुस्तीसाठी विशेष सेवा मोहिमेचे नाव दिले आहे. हा एकप्रकारचा रिकॉल आहे, परंतू कंपनीने ज्या ग्राहकांना ही समस्या जाणवत आहे त्यांना आपणहून येण्यास सांगितले आहे.
कंपनीने म्हटले की Ertiga, Swift, Dzire, Ciaz आणि XL6 या कारच्या इंजिनांमध्ये ग्राहकांना विचित्र आवाज येत आहेत. हा आवाज खराब इंजिन माऊंटमुळे येण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. यामुळे कंपनीने एक खास सर्व्हिस कॅम्पेन सुरु करण्य़ाचा निर्णय घेतला असून या वाहनांचे निरिक्षण करण्यात येणार आहे. गरज पडली तर या कारचे खराब पार्ट बदलण्यात येणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, इंजिनमध्ये येणारी ही कंपनं उजव्या बाजूला असलेल्या खराब माउंट पार्ट्स क्रमांक 11610M72R00 मुळे येत आहेत. मारुती सुझुकी या निवडक कारमधील कट ऑफ वाहन ओळख क्रमांकाद्वारे ही समस्या सोडवेल. यासाठी तुम्ही मारुतीच्या वेबसाइटवरही संपर्क करू शकता.
Dzire – MA3EJKD1S00C76583
Swift – MBHCZCB3SMG838412
Ertiga – MA3BNC32SMG361698
Ignis – MA3NFG81SMG319333
XL6 – MA3CNC32SMG261516
Ciaz – MA3EXGL1S00437213 या कारनुसार हे पार्ट आहेत.