Maruti Suzuki New Car : फेस्टिव्ह सीझनमध्ये मारूती करणार जबरदस्त धमाका, जबरदस्त मायलेजसह लाँच होणार दोन कार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:30 PM2022-05-30T15:30:36+5:302022-05-30T15:31:19+5:30

Maruti Suzuki New Car : एकेकाळी सीएनजी गाड्या आणणारी मारूती ही एकमेव कंपनी होती. आताही या सेगमेंटमध्ये मारूतीचाच बोलबाला आहे.

maruti suzuki baleno cng to launch date brezza 2022 price mileage to compete tata hyunda toyota cars | Maruti Suzuki New Car : फेस्टिव्ह सीझनमध्ये मारूती करणार जबरदस्त धमाका, जबरदस्त मायलेजसह लाँच होणार दोन कार्स

Maruti Suzuki New Car : फेस्टिव्ह सीझनमध्ये मारूती करणार जबरदस्त धमाका, जबरदस्त मायलेजसह लाँच होणार दोन कार्स

Next

Maruti Suzuki New Car : महागड्या डिझेल-पेट्रोलमुळे (Petrol Diesel Price Hike) देशात सीएनजी कारची (CNG Cars) मागणी झपाट्याने वाढली आहे. याचाच फायदा घेण्यासाठी टाटा (Tata Motors) आणि ह्युंदाई (Hyundai Motors) सारख्या कंपन्याही आता सीएनजी मॉडेल आणत आहेत. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही एकेकाळी भारतात सीएनजी कार्सची विक्री करणारी एकमेव कंपनी होती. सीएनजी सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीचे अजूनही वर्चस्व आहे. हे स्थान कायम ठेवण्यासाठी कंपनी नवीन सीएनजी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी आगामी सणासुदीच्या हंगामातील मागणीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आणखी काही मॉडेल्स आणण्याच्या विचारात आहे.

काही वृत्तांनुसार मारुती सुझुकी सेकंड जनरेशन ब्रेझा आणि बलेनो सीएनजी लाँच करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय टोयोटासोबत मिळून कंपनी एक मिड साईज एसयुव्हीवर काम करत आहे. या गाड्या आगामी फेस्टिव्ह सीझनपूर्वी लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीनं अधिकृतरित्या मात्र याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. 

ब्रेझामध्ये सीएनजी इंजिन?

न्यू जनरेशन ब्रेझा ही जून महिन्यात लाँच केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. या कारचे प्री-बुकिंग आधीच सुरू झाले आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत न्यू जनरेशन ब्रेझा हे डिझाईन, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत पूर्णपणे वेगळे असेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. नवीन व्हर्जनमध्ये मायलेजही अधिक मिळेल अशा चर्चा सुरू आहेत. यात 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो. काही बातम्यांमध्ये असा दावाही केला जात आहे की कंपनी CNG किटसोबत Brezza देखील देऊ शकते. 

तर दुसरीकडे बलेनोमध्येही 6 स्पीड ऑटो ट्रान्समिशन मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या व्हेरिअंटपेक्षा ही कार 60 ते 70 हजार रुपये महाग असू शकते. सध्या बलेनोची किंमत 6.35 लाख रुपये ते 9.49 लाख रूपयांदरम्यान आहे.

Web Title: maruti suzuki baleno cng to launch date brezza 2022 price mileage to compete tata hyunda toyota cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.