Maruti Suzuki Baleno चे फेसलिफ्ट लाँच; टोयोटाही विकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:13 PM2019-01-29T12:13:36+5:302019-01-29T12:14:18+5:30
Maruti Suzuki ने तीन वर्षांपूर्वी ही कार लाँच केली होती. बाजारात प्रिमिअम श्रेणीमध्ये कार विकण्यासाठी सुझुकीने नेक्सा नावाचा ब्रँड सुरु केला होता.
नवी दिल्ली : मारुती सुझुकीची नेक्साच्या ब्रँडखाली प्रसिद्ध असलेली बलेनोची फेसलिफ्ट लाँच करण्यात आली. ही प्रिमिअम हॅचबॅक श्रेणीमधली कार असून या कारची टक्कर Hyundai Elite i20 आणि Honda Jazz सोबत होणार आहे. मारुतीने बलोनोला 11 व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे.
Maruti Suzuki ने तीन वर्षांपूर्वी ही कार लाँच केली होती. बाजारात प्रिमिअम श्रेणीमध्ये कार विकण्यासाठी सुझुकीने नेक्सा नावाचा ब्रँड सुरु केला होता. मारुतीने या कारमध्ये फारसा बदल केलेला नाही. काहीसे इंटेरिअर आणि सेफ्टी फिचर्स वाढवत दोन जादा रंग उपलब्ध केले आहेत. शिवाय किंमतही 9 हजार रुपयांनी वाढविली आहे. डीआरएल स्टँडर्ड देण्यात आले आहेत.
आतमध्ये 17.78 सेमींची टचस्क्रीन दिली आहे. एक्स शोरुम किंमत 5.45 लाख ते 8.6 लाख रुपये ठेवली आहे. 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर डिझेल इंजिन देण्य़ात आले आहे. तसेच व्हॉईस रेकग्निशन सिस्टिम आणि पार्किंग कॅमेराही देण्यात आलेला आहे. ही कार करारानुसार आता टोयोटाच्या शोरुपमध्येही उपलब्ध होणार आहे. मात्र, यावर मारुतीचा लोगो नसणार आहे.