Maruti Suzuki खाली करतेय जुना स्टॉक, २० हजारांच्या सूटसह विक्री होतेय Baleno कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 02:45 PM2022-12-10T14:45:38+5:302022-12-10T14:46:48+5:30
Maruti Suzuki Baleno December Offers: वर्षाच्या शेवटी अनेक कार कंपन्या त्यांच्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात.
Maruti Suzuki Baleno December Offers: वर्षाच्या शेवटी अनेक कार कंपन्या त्यांच्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात. पण तुम्ही ऐकलं असेल की तुमची जुनी कार दिल्यानंतरही तुम्हाला उत्तम ऑफर्स मिळत आहेत. होय, आता तुम्हाला तुमच्या जुन्या कारच्या बदल्यात चांगली ऑफर मिळू शकते. म्हणजे आता तुम्ही तुमच्या कार पार्किंगमधील जुनी कार काढून नवी कार घेऊ शकणार आहात. मारुती सुझुकी तुम्हाला तुमच्या जुन्या कारवर १० हजारांपर्यंत डिस्काऊंट देत आहे.
बलेनोवर मिळतेय इतकी सूट
मारुती सुझुकीची बलेनो नोव्हेंबर महिन्यात देशात सर्वाधिक विक्री होणारी कार होती, नोव्हेंबर महिन्यात २०,००० युनिट्सची विक्री झाली. ही मारुतीची प्रीमियम हॅचबॅक आहे जी Nexa डीलरशिपद्वारे विकली जाते. मारुती या कारवर अत्यंत दुर्मिळ प्रसंगी सूट देते. पण, या डिसेंबरमध्ये मारुती बलेनो आपल्या ग्राहकांना २०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे.
काय आहे एक्चेंज ऑफर
कंपनी डिसेंबरच्या शेवटी बलेनोच्या सर्व मॅन्युअल प्रकारांवर २०,००० रुपयांची सूट देत आहे. यामध्ये १०,००० रुपयांच्या कन्झ्युमर ऑफरचा समावेश आहे. याशिवाय तुम्ही तुमची जुनी कार एक्सचेंज केल्यास तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळेल.
Maruti Suzuki Baleno Price
दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख रुपये इतकी आहे, तर टॉप एंड व्हेरिएंटची किंमत ९.७१ लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकीनं नुकतंच आपल्या बलेनो कारचं सीएनजी मॉडेल भारतात लाँच केलं आहे. बलेनोचं सीएनजी मॉडेल दोन प्रकारात उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत या कारच्या CNG मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ८.२८ लाख रुपये आहे. Baleno S-CNG मध्ये १.२-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 6000 rpm वर 76 bhp ची पावर आणि 4300 rpm वर 98.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.