Maruti Suzuki Baleno Safty Rating: स्विफ्टनंतर मारुतीची आणखी एक प्रिमियम कार झिरो स्टार; NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 01:40 PM2021-10-29T13:40:47+5:302021-10-29T13:47:49+5:30
Maruti Suzuki Baleno NCAP Safty Rating: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki (मारुती सुझुकी) जगभरात आता वाईट सेफ्टी रेटिंगसाठी ओळखली जाऊ लागली आहे. स्विफ्ट देखील क्रॅश टेस्टमध्ये फेल झाली होती.
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki (मारुती सुझुकी) जगभरात आता वाईट सेफ्टी रेटिंगसाठी ओळखली जाऊ लागली आहे. मारुती स्विफ्टनंतर आता बलेनो (Baleno) ला देखील लॅटिन NCAP मध्ये झिरो सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये पास होणारी बलेनो ही मारुतीची गेल्या काही महिन्यांतील दुसरी कार आहे. स्विफ्ट देखील क्रॅश टेस्टमध्ये फेल झाली होती. बलेनो आणि स्विफ्ट या भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार आहेत. या कारचा खप मारुतीला देशातील सर्वात मोठी कंपनी बनवितो. आता स्विफ्ट सीएनजीमध्ये देखील येणार आहे.
एनकॅपमध्ये बलेनोला अॅडल्ट ऑक्युपन्सी सेफ्टीमध्ये 20.03 टक्के, चाईल्ड सेफ्टी 17.06 टक्के आणि पादचाऱ्यांचयी सुरक्षेसाठई 64.06 टक्के मिळाले आहेत. तर सेफ्टी असिस्ट बॉक्समध्ये 6.98 टक्के मिळाले आहेत. बलेनोने पुढून अपघात झाला तर त्या टेस्टमध्ये स्थिर रचना दाखविली आहे. हीच एक जमेची बाजू आहे. मात्र, साईड टेस्टमध्ये मोठ्या व्यक्तीच्या छातीला मार बसत असल्याचे तसेच दरवाजावर उच्च दाब पडत असल्याचे दिसले आहे.
खराब साइड इफेक्ट प्रोटेक्शन, मार्जिनल व्हिपलॅश प्रोटेक्शन, स्टँडर्ड साइड बॉडी आणि हेड प्रोटेक्शन एयरबॅग्सची कमतरता, स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) व सुझुकीच्या चाईल्ड रेस्ट्रेंट सिस्टिम न देण्याच्या निर्णयामुळे बलेनोला झिरो स्टार मिळत असल्याचे एनकॅपने म्हटले आहे.
काही आठवड्यांपूर्वी स्विफ्ट आणि आता बलेनोला झिरो स्टार मिळाले आहेत. हे दुर्भाग्याचे आहे, अशी प्रतिक्रिया लॅटिन एनकॅपचे महासचिव अलेजांद्रो फुरास यांनी म्हटले आहे. ही कार लॅटिन अमेरिकी ग्राहकांसाठी खराब सेफ्टी फिचरवाली कार असल्याचे तेम्हणाले. तसेच त्यांनी टोयोटाच्या यारिसवर देखील टीका केली आहे. तिला एक स्टार मिळाला आहे.