मारुती सुझुकी ब्रेझाला मॉडिफाय करून केली रेंज रोव्हर, पाहा जबरदस्त Photos
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 09:07 AM2023-01-07T09:07:18+5:302023-01-07T09:10:12+5:30
मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं फेसलिफ्ट व्हर्जन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं.
मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं (Maruti Brezza 2022 Launch) फेसलिफ्ट व्हर्जन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं. कंपनीनं या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये बरेच नवे फिचर्स दिले आहेत. अवघ्या काही महिन्यांमध्ये ही कार ग्राहकांच्या पसंतीसही उतरली आहे. बाहेरचं डिझाईन हे कारचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
नुकतेच मारुती ब्रेझाचं मॉडिफाईड व्हर्जन समोर आलं आहे. यामध्ये तब्बल 2 लाखांपेक्षाही अधिक किंमतीच्या ॲक्सेसरीजचा वापर करण्यात आलाय. या ॲक्सेसरीजसोबत ही का कर लँड रोव्हर एसयूव्हीची आठवणही करून देते. मॉडिफाईड कारमध्ये आता फ्रन्ट बम्परच्या खालील भागात एक कस्टम व्हाईट पेंज जॉबशिवाय रोव्हर कार्सप्रमाणे एक नवीन फ्रन्ट ग्रिल देण्यात आलेय.
या कारमध्ये हेडलाईट्सच्या खालील भागात एक्सटेंडेड डीआरएल, एलईडी फॉग लँप आणि हुडवर रेंज रोव्हर बॅज देण्यात आलाय. याचप्रकारे कारमध्ये ड्युअल टोन व्हाईट ब्लॅक कलर स्कीमही दिसून येते. यामुळे कार अतिशय मनमोहकही दिसते. कारमध्ये 18 इंचाचे मल्टिस्पोक मशीन कट अलॉय व्हिल्सही देण्यात आलेत, हे 245/45/R18 च्या टायर्स साईजसह येतात.
आणखी काय खास?
मॉडिफाईड ब्रेझामध्ये ओआरवीएमच्या खाली सिल्व्हर स्टिकरशिवाय कस्टम फेंडर ट्रिम एलिमेंट्सही देण्यात आलेत. तर बॉडी क्लॅडिंगलाही पांढऱ्या रंगानं पेंट करण्यात आलंय. मागील बाजूलाही कस्टम ब्लॅक रेंज रोव्हर लोगो आणि नवे ड्युअल टिप एक्झॉस्ट सेटअप देण्यात आलेय.
इंटिरिअरमध्ये रेट्रोफिटेड सीट कव्हर, स्टिअरिंग रँप आणि डॅशबोर्ड रँप सोसबत ड्युअल टोन ब्राऊन ब्लॅक थीम मिळते. यामध्ये अँबिअंट लाईट, इल्युमिनिटेड डोअर सिल्ससोबत डोअर पॅड्स, प्रीमिअम 7 डी मॅट्स आणि आर्म रेस्टवर लेटर रँपही मिळतो. याशिवाय कारमध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही.
पावरमध्ये दमदार आहे Brezza
नव्या ब्रेझामध्ये 1.5 लीटर ड्युअल जेट के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन नुकतंच मारुतीनं Ertiga आणि XL6 मध्येही उपलब्ध करुन दिलं आहे. इंजिन 101bhp ची सर्वाधिक पावर आणि 137Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील मिळणार आहेत. मारुती सुझुकी ब्रेझाच्या मॅन्युअल बेस व्हेरिअंटची किंमत 7.99 लाख रुपये एक्स शोरुम आहे.