मारुतीच्या 'या' 7 कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट; वॅगनआर, अल्टो, स्विफ्टचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:08 PM2022-03-24T19:08:37+5:302022-03-24T19:13:12+5:30
कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सवर 28,000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट देत आहे. आज आम्ही आपल्याला मारुतीच्या गाड्यांवर दिल्या जाणाऱ्या ऑफर्ससंदर्भात सांगणार आहोत.
नवी दिल्ली - होळी सण संपला आहे आणि याच बरबोर सणासुदीच्या काळात वाहनांवर मिळणाऱ्या ऑफर्सदेखील संपल्या आहेत. मात्र, आपल्याला फेस्टिव्ह सिझनमध्ये ऑफर्सचा फायदा घेता आला नसला तरी, निराश होण्याची गरज नाही. कारण, होळीनंतरही मारुती सुझुकी आपल्या गाड्यांवर जबरदस्त डिस्काउंड देत आहे.
कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सवर 28,000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट देत आहे. आज आम्ही आपल्याला मारुतीच्या गाड्यांवर दिल्या जाणाऱ्या ऑफर्ससंदर्भात सांगणार आहोत. याशिवाय, आम्ही आपल्याला त्यांच्या किंमतींसंदर्भातही माहिती देणार आहोत.
या महिन्यात मारुती सुझुकी आपल्या WagonR, Maruti Alto, Vitara Briza, Swift, Dzire, Celerio आणि S-Presso सारख्या कार्सवर मोठी ऑफर देत आहे. ग्राहकांना मारुतीच्या गाड्यांवर रोख डिस्काउंटसह एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतींपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहेत.
या महिन्यात ग्राहकांना Maruti Suzuki Alto, Maruti Suzuki Swift आणि Maruti Suzuki S-Presso वर सर्वाधिक ऑफर दिली जात आहे. तर, सर्वात कमी डिस्काउंट Maruti Suzuki WagonR वर दिला जात आहे.
अशी आहे ऑफर -
दिल्ली एक्स-शोरूम किमतीनुसार, कारचे नाव आणि एकूण डिस्काउंट असा -
- Maruti Suzuki Alto - 28,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
- Maruti Suzuki S-Presso - 28,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
- Maruti Suzuki Swift - 28,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
- Maruti Suzuki Celerio - 23,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
- Maruti Suzuki Dzire - 23,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
- Maruti Suzuki Brezza - 18,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
- Maruti Suzuki WagonR - 13,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
टीप - या ऑफर्स 31 मार्च 2022 पर्यंत मर्यादित आहेत. याशिवाय, या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि डीलरशिपनुसार बदलूही शकतात. या वाहनांच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. महत्वाचे म्हणजे, कार खरेदी करण्यापूर्वी, मारुतीच्या अधिकृत डीलरशिपसोबत संपर्क साधून ऑफरसंदर्भात जाणून घेणे आवश्यक आहे.