Maruti Suzuki Cars Global NCAP Ratings: मारुतीला १ नंबर मिळाला; विक्रीत तर होताच, GNCAP क्रॅश टेस्टमध्ये तीन कार फेल झाल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:58 PM2022-12-15T12:58:23+5:302022-12-15T12:58:50+5:30
मारुती सुझुकीच्या कारमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांवर भर दिला जातो. उत्तम मायलेज, सुलभ सेवा आणि इतर अनेक कारणांमुळे मारुती सुझुकीच्या कार भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. परंतू तेवढी सुरक्षा ग्राहकांना मिळत नाही.
काही वर्षांपूर्वी कारच्या सेफ्टी रेटिंग टेस्च करणाऱ्या ग्लोबल एनकॅपचे अध्यक्ष भारतात आले होते. तेव्हा देशातील पहिलीच फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळविलेल्या कारच लाँचिंग होते. यावेळी या अध्यक्षांनी मारुतीला ग्राहकांची सुरक्षा करणाऱ्या ५स्टार कार बनविण्याचे आव्हान दिले होते. मारुतीने आम्ही तुमच्याकडे कारच पाठविणार नाही असे म्हटले होते. परंतू, नुकत्याच कंपनीने तीन कार GNCAP टेस्टिंगसाठी पाठविल्या होत्या. त्यांचे रिझल्ट आले आहेत, जे धक्कादायक आहेत.
मारुती सुझुकीने स्विफ्ट, इग्निस आणि एस प्रेसो सेफ्टी रेटिंगसाठी पाठविली होती. परंतू या तिन्ही कार फेल झाल्या आहेत. ग्लोबल एनकॅपने क्रॅश टेस्टमध्ये या तिन्ही कारना केवळ १ स्टार दिला आहे. मारुतीच्या या कारची कामगिरी ग्राहकांना चिंतेत टाकणारी जरूर आहे.
ग्लोबल NCAP कार क्रॅश चाचणीमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट तसेच इग्निस आणि एस-प्रेसो पाठविण्यात आली होती. स्विफ्ट हॅचबॅकला प्रौढांचे संरक्षण आणि मुलांचे संरक्षण यामध्ये फक्त एक स्टार मिळाला आहे. तर, इग्निस आणि एस-प्रेसो यांना प्रौढ संरक्षणात एक स्टार आणि मुलांच्या संरक्षणात शून्य स्टार मिळाला आहे. GNCAP ला तिन्ही कारचे बॉडीशेल आणि फुलवेल क्षेत्र अस्थिर असल्याचे आढळले. जेव्हा या तीन गाड्या समोरून एका जड वस्तूवर आदळवल्या तेव्हा त्या कारचे तुकडे तुकडे झाले.
मारुती सुझुकीच्या कारमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांवर भर दिला जातो. उत्तम मायलेज, सुलभ सेवा आणि इतर अनेक कारणांमुळे मारुती सुझुकीच्या कार भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. परंतू तेवढी सुरक्षा ग्राहकांना मिळत नाही. टाटा आणि महिंद्राने तसेच फोक्सवॅगनने फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार भारतात आणल्या आहेत. सर्वाधिक कार या टाटाच्या आहेत.