Maruti Suzuki Subscription: मारुतीची सबस्क्रीप्शन सर्व्हिस आणखी ४ शहरांमध्ये सुरू, पाहा कोणत्या कारसाठी द्यावे लागणार किती रुपये?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:21 PM2021-06-29T21:21:52+5:302021-06-29T21:22:15+5:30
Maruti Suzuki Cars : कंपनीनं सप्टेंबर महिन्यात सुरू केली होती ही सेवा.
मारुती सुझुकी या कंपनीनं सप्टेंबर २०२० मध्ये आपली सबस्क्राईब सेवा सुरू केली होती. याचाच अर्थ ग्राहकांना मारूतीची कार खरेदी केल्याशिवाय ती घेण्याचा पर्याय उपलब्ध होणार होता. कार लिजिंग ही काही नवी सेवा नाही. परंतु याचा ट्रेंड गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक कार उत्पादक यामध्ये उतरल्यानंतर यात वाढ दिसून आली होती. मारूतीची पायलट सबस्क्रीप्शन सेवा गुरुग्राम आणि बंगळुरूमध्ये सुरू झाली होती. यानंतर ती दिल्ली आणि एनसीआरमध्ये सुरू करण्यात आली होती. सध्या कंपनीनं ही सेवा १९ शहरांमध्ये देण्यास सुरूवात केली आहे. कंपनीनं नुकतीच ही सेवा जयपूर, इंदूर, मंगळुरू आणि म्हैसूरमध्ये लाँच केली आहे.
मारुती सुझुकीचा सबस्क्राईब असा प्लॅटफॉर्मवर काम करतं ज्यात अनेक पार्टर्नर्सद्वारे कस्टमाईज्ड कार सबस्क्रीप्शन प्लॅटफॉर्मवर सादर करण्यात येतात. आता सबस्क्राईब प्लॅटफॉर्म आपल्या ग्राहकांना विशेषरित्या तयार करण्यात आलेले प्रोडक्ट सादर करतं. यामध्ये तीन सब्सक्रिप्शन पार्टनर्स Orix ऑटो इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Orix), ALD ऑटोमेटिव्ह इंडिया (ALD ऑटोमेटिव्ह), and Myles ऑटोमेटिव प्रायव्हेट लिमिटेड (Myles) यांचा समावेश आहे.
मारूती सुझुकी स्विफ्टसाठी ग्राहकांना १४,१७६ रूपये, इग्निससाठी १३,१०९ आणि वॅगन आरसाठी १२.३२५ रूपये मासिक इतके दर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना सफेद किंवा काळ्या रजिस्ट्रेशन प्लेट निवडण्याचाही पर्याय मिळतो. ग्राहकांना Maruti Arena आणि NEXA लाईनअपमधून कार निवडता येतील. यामध्ये WagonR, Swift, Dzire, Vitara Brezza, Ertiga आणि Ignis, Baleno, Ciaz, S-Cross, XL6 या कार्सचा समावेश आहे. सफेद रंगाच्या नंबर प्लेटमध्ये ग्राहकांच्या नावावर कारचं रजिस्ट्रेशन केलं जातं. यामध्ये १२,२४,३६ आणि ४८ महिन्यांच्या कालावधीचा समावेश आहे. तसंच वार्षिक १० हजार, १५ हजार, २० हजार आणि २५ हजार किलोमीटरचा समावेश आहे.