'सर्वात बेस्ट मायलेज'सह येतेय Maruti Suzuki ची Celerio; 11 हजारांत सुरु झालं बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:34 PM2021-11-02T21:34:35+5:302021-11-02T21:34:35+5:30
मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) भारतीय बाजारपेठेत नवीन रुपात लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) भारतीय बाजारपेठेत नवीन रुपात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने मंगळवारपासून या कारतं बुकिंगही सुरू केले आहे. दरम्यान, ही कार ग्राहकांना केवळ 11 हजार रूपयांमध्ये बुक करता येणार आहे अशी घोषणा कंपनीने केली आहे. नव्या अपडेटेड सेलेरियोमध्ये एक्सटिरिअर आणि इंटरिअरमध्ये बदलस करण्यात आले असून त्यात काही सेगमेंट फर्स्ट फीचर्सही असणार आहेत. दरम्यान, ही देशातील सर्वाधिक फ्युअल एफिशिअंट पेट्रोल कारही असणार आहे, असा दावा कंपनीनं केला आहे.
"नव्या पेट्पोल इंजिन, स्टायलिस्ट डिझाईन आणि सेगमेंट फर्स्ट फीचरसोबत येणारी सेलेरियो ही एक ऑल राऊंडर आहे," अशी प्रतिक्रिया मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडचे मार्केटिंगच आणि सेल्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं. न्यू सेलेरियो पुम्हा एकदा कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये उत्साह भरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नेक्स्ट जेन Kseries ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन आणि सेगमेंटमध्ये पहिल्यांदा आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजीसोबत ऑल न्यू सेलेरियो भारताची सर्वात एफिशिअंट पेट्रोल कार असेल, अशी प्रतिक्रिया कंपनीचे चीफ टेक्निकल ऑफिसर (इंजिनिअरिंग) श्री सीव्ही रमन यांनी दिली.
काय असतील फीचर्स?
नवीन सेलेरियोमध्ये नेक्स्ट जनरेशन के-सीरीज ड्युअल-जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन दिले जाईल. यामध्ये मायलेज वाढवण्यासाठी आयडी स्टार्ट-स्टॉप सुविधा मिळेल, असे मारूती सुझुकीनं यापूर्वीच सांगितले. सध्या याच्या इंजिनची पॉवर आणि टॉर्कबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामध्ये हेड लाईट डिझाईनदेखील अपडेट करण्यात आलं आहे. तसंच ओव्हरऑल प्रोफाईल आता पहिल्यापेक्षा अधिक राऊंडेड करण्यात आलं आहे.
या कारचं 11 हजार रूपयांमध्ये बुकिंग करता येणार आहे. तसंच मारूती सुझुकीच्या एरिनाच्या वेबसाईटवर www.marutisuzuki.com/celerio या साईटवर लॉग इन करावं लागेल. याशिवाय ग्राहकांना ही कार सुझुकी एरिना शोरूममधूनही बुक करता येऊ शकते.