Maruti Suzuki Dzire S-CNG लाँच; 31 किमी पेक्षा जास्त मायलेज, कंपनीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:49 PM2022-03-08T16:49:09+5:302022-03-08T16:50:05+5:30
Maruti Suzuki Dzire S-CNG : मारुती सुझुकी डिझायर सीएनजी ( Maruti Suzuki Dzire CNG) व्हीएक्सआय (VXi) आणि झेडएक्सआय (ZXi) या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान मारुती सुझुकीने नवी सीएनजी कार लॉन्च केली आहे. देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी (मारुती सुझुकी) ने मंगळवारी त्यांची सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार डिझायरचे सीएनजी व्हेरिएंटला लॉन्च करण्याची घोषणा केली. मारुती सुझुकी डिझायर सीएनजी ( Maruti Suzuki Dzire CNG) व्हीएक्सआय (VXi) आणि झेडएक्सआय (ZXi) या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
मारुती डिझायर सीएनजी व्हीएक्सआय व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.14 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मारुती डिझायर सीएनजी झेडएक्सआय व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.82 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने डिझायर सीएनजी सेडान देखील सबस्क्रिप्शन मॉडेलवर उपलब्ध करून दिली आहे. मारुती सुझुकीने म्हटले आहे की, डिझायर सीएनजी मॉडेलसाठी मासिक सब्सक्रिप्शन फी 16,999 रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी डिझायर सीएनजी त्याच्या सेगमेंटमधील ह्युंदाई ऑरा सीएनजी आणि टाटा टिगोर सीएनजी सारख्या कारशी स्पर्धा करेल. याशिवाय, मारुती सुझुकी डिझायरचे सीएनजी व्हेरिएंट ऑटोमेकरच्या इतर सीएनजी कारच्या यादीत सामील झाले आहे, ज्यात सेलेरियो, वॅगनआर सारख्या कारचा समावेश आहे. या सीएनजी सेडानच्या लॉन्चसोबत मारुती सुझुकीच्या सीएनजी पोर्टफोलिओमध्ये एकूण नऊ सीएनजी कार आहेत.
मारुती सुझुकीचा दावा आहे की, डिझायर सेडानचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करणे, हे तेल आयात कमी करण्याच्या आणि भारताच्या प्राथमिक ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचा वाटा 2030 पर्यंत 6.2 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी हे स्वच्छ आणि हिरवे इंधन मानले जाते. तसेच, सीएनजी पेट्रोल आणि डिझेलपेक्षा चांगले मायलेज देते. त्यामुळे सीएनजी हा कार मालकांसाठी अधिक किफायतशीर पर्याय ठरतो.
इतर फीचर्स
डिझाईनच्या बाबतीत डिझायर सीएनजी पेट्रोल इंजिन व्हेरिएंट प्रमाणेच आहे. यामध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे बूट स्टोरेजमध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किट सामील आहे. सीएनजी किट 1.2-लीटर K-Series ड्युअल-जेट ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह कार्य करते. हे इंजिन सीएनजी मोडमध्ये आहे आणि 6,000 rpm वर 77 PS पॉवर आणि 98.5 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच मारुती सुझुकी डिझायर सीएनजी कार 31.12 kmpl चा मायलेज देते.