Hyundai, Tata ला धोबीपछाड! Maruti ची ‘ही’ कार नंबर १; किंमत कमी, फिचर्स दमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 03:09 PM2022-06-08T15:09:02+5:302022-06-08T15:09:30+5:30
मारुतीच्या या सेडान कारच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९९ टक्के वाढ झाली आहे. पाहा, डिटेल्स...
नवी दिल्ली: आताच्या घडीला Maruti Suzuki कंपनीचे भारतीय बाजारात निर्विवाद वर्चस्व आहे आणि ते कंपनीने टिकवूनही ठेवले आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारी काढून पाहिल्यास मारुती सुझुकी कंपनी प्रत्येक महिन्याला जेवढी विक्री करते, त्याच्या आसपासही कुणी नसल्याचे दिसून येऊ शकेल. यातच मे महिन्यातील विक्रीचे आकडे समोर आले असून, मारुतीच्या सेडान कारने या सेगमेंटमध्ये अन्य स्पर्धक कंपन्यांना धोबीपछाड देत, क्रमांक एक कायम ठेवला आहे.
Maruti Suzuki Dzire सेडान ही मे 2022 महिन्यात तिच्या सेगमेंटमधली भारतात सर्वात जास्त विक्री होणारी कार बनली आहे. मारुतीने गेल्या महिन्यात डिझायरच्या एकूण ११ हजार ६०३ युनिट्सची विक्री केली आहे. २०२१ मध्ये याच महिन्यात कंपनीने डिझायरच्या ५,८१९ युनिट्सची विक्री केली होती. डिझायरच्या विक्रीत यंदा ९९ टक्के वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या डिझायरच्या बेस व्हेरिएंटची किंमत ६.२४ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ९.१७ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. नवीन डिझायर सीएनजी पर्यायातही उपलब्ध असून, अनेकविध दमदार फिचर्स यात देण्यात आलेले आहेत.
टाटा ठरली क्रमांक २ ची कंपनी
गेल्या काही वर्षांपासून भारतात एसयूव्ही, कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्सची विक्री वाढली आहे. दुसऱ्या बाजूला सेडान कार्सची विक्री मात्र काही प्रमाणात घटली आहे. असे असले तरी डिझायरसह टाटा मोटर्सच्या टाटा टिगॉर या कारने बाजारात चांगली कामगिरी केली आहे. विक्रीच्या बाबतीत आणि सेडानच्या यादीत टाटा टिगॉर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे २०२२ मध्ये कंपनीने टिगॉरच्या ३,९७५ युनिट्सची विक्री केली आहे. २०२१ मध्ये याच महिन्यात कंपनीने टिगॉरच्या ३६७ युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने यंदा टिगॉरच्या विक्रीत ९८३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
दरम्यान, या यादीत होंडा अमेझ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने मे २०२२ मध्ये या कारच्या ३७०९ युनिट्सची विक्री केली आहे गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने अमेझच्या ४७८ युनिट्सची विक्री केली होती. होंडाने अमेझच्या विक्रीत ६७६ टक्के वाढ नोंदवली आहे.