Maruti Suzuki Engage 7 Seater Car: मारुती कात टाकणार! 7 सीटरमध्ये आणखी एक एसयुव्ही लाँचची तयारी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 05:48 PM2023-04-29T17:48:12+5:302023-04-29T17:48:41+5:30
मारुतीची ही प्रमिअम एसयुव्ही जुलै २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.
मारुती सुझुकी आपल्या प्रमिअम एमपीव्हीमध्ये आणखी एक सात सीटर एसयुव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. मारुती एंगेज या नावाने एसयुव्ही आणू शकते. मारुतीने या नावाचा ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचा रिबॅज व्हर्जन असणार आहे. ही कार मारुतीच्या ग्रँड व्हिटाराच्या बेसवर असणार आहे.
मारुतीची ही प्रमिअम एसयुव्ही जुलै २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. मारुती सुझुकीच्या नवीन एमपीव्हीचे डिझाइन आणि स्टाइल टोयोटा इनोव्हा हायक्रॉसपेक्षा थोडे वेगळे असेल. यात ब्रँडची सिग्नेचर ग्रिल सोबत पुन्हा डिझाइन केलेले हेडलॅम्प, टेललॅम्प आणि फ्रंट बंपर मिळेल. हे इनोव्हा हायक्रॉस सारख्या फ्रंट-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह मोनोकॉक TNGA-C प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
एंगेजमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS), वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, ऑटोमन फंक्शनसह दुसऱ्या रांगेतल्या सीट ड्युअल-पेन पॅनोरामिक सनरूफ, एअरबॅग समाविष्ट आहेत.
इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी एंगेज एमपीव्हीमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज 2.0-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन 186 PS ची कमाल पॉवर आणि 206Nm चा पिकअप टॉर्क जनरेट करेल. मारुती सुझुकीच्या आगामी 7 सीटर MPV ची किंमत 18 लाख ते 30 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.