Maruti Suzuki Ertiga Launch : 7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 01:33 PM2022-04-15T13:33:37+5:302022-04-15T13:36:09+5:30

Maruti Suzuki Ertiga Launch : कंपनीने एर्टिगा या 7-सीटर MPV मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे कारला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे.

Maruti Suzuki Ertiga 2022 launched; gets new engine, 6-speed AT. Check price | Maruti Suzuki Ertiga Launch : 7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन 

Maruti Suzuki Ertiga Launch : 7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन 

googlenewsNext

नवी दिल्ली : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) भारतीय बाजारात 2022 एर्टिगा (2022 Ertiga) लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे, तर  MPV च्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 12.79 लाख रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, मारुती सुझुकीने एर्टिगाच्या टॉप मॉडेल ZXi सोबत पहिल्यांदाच CNG ऑप्शन आणला आहे. 

कंपनीने एर्टिगा या 7-सीटर MPV मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे कारला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. नवीन कार जुन्या मॉडेलच्या तुलनेत दिसण्यात थोडी वेगळी आहे. एर्टिगा भारतात पहिल्यांदा 2012 मध्ये लॉन्च करण्यात होती. त्यानंतर ग्राहकांमध्ये या परवडणाऱ्या फॅमिली कारची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही.

11 व्हेरिएंट्समध्ये लॉन्च 
मारुती सुझुकीने 2022 मॉडेल एर्टिगा MPV ला 11 व्हेरिएंट्समध्ये लॉन्च केले आहे,  ज्यामध्ये VXi, ZXi आणि ZXi Plus ला ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळतात, तर CNG ऑप्शन देखील दोन व्हेरिएंट्ससह उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन मारुती एर्टिगा सह, कंपनीने आधीच अॅडव्हान्स K-Series Dual VVT इंजिन दिले आहे, जे पूर्वीच्या इंजिनच्या तुलनेत खूपच किफायतशीर आहे. कंपनीने हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज केले आहे आणि आता ऑटोमॅटिक व्हेरियंटसह नवीन 6-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीने ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील दिले आहेत.

किती बदलला एक्सटीरियर?
मारुती सुझुकीने 2022 एर्टिगाच्या बाहेरील भागामध्ये आमुलाग्र बदल केला आहे, जो आता दोन-रंगाच्या अलॉय व्हील आणि ग्रिलवर नवीन क्रोम फिनिशसह येतो. कंपनीने ही कार 6 रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये सिल्व्हर आणि ब्राऊन हे नवीन रंग आहेत. कारच्या केबिनमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहे आणि MPV आता नवीन 7-इंचाच्या टचस्क्रीन डिस्प्लेसह येते,  जी Suzuki Connect आणि Amazon Alexa ला सपोर्ट करते.

डॅशबोर्डवर टीक वुडन फिनिश देण्यात आला आहे, तर सीटवर दोन रंगांची अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. मधल्या सीटला फोल्ड केले जाऊ शकते, ज्यामुळे सामान ठेवण्यासाठी अधिक मिळू शकते. दरम्यान, भारतीय मार्केटमध्ये ही परवडणारी एर्टिगा MPV रेनॉल्ट ट्रायबरशी स्पर्धा करण्यास तयार आहे.

Web Title: Maruti Suzuki Ertiga 2022 launched; gets new engine, 6-speed AT. Check price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.