'या' 7 सीटर कारची मागणी मार्केटमध्ये वाढली; मायलेज 26 KM तर किंमत फक्त 8.6 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:25 PM2023-08-01T20:25:22+5:302023-08-01T20:27:45+5:30

Maruti Suzuki Ertiga Waiting Period: कंपनीने 15 मार्चला अपडेटेड एर्टिगा लाँच केली आणि तेव्हापासून ही एमपीव्ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे. 

maruti suzuki ertiga best selling mpv in india price and mileage | 'या' 7 सीटर कारची मागणी मार्केटमध्ये वाढली; मायलेज 26 KM तर किंमत फक्त 8.6 लाख

'या' 7 सीटर कारची मागणी मार्केटमध्ये वाढली; मायलेज 26 KM तर किंमत फक्त 8.6 लाख

googlenewsNext

नवी दिल्ली :  भारतीय ऑटोमाबाईल मार्केटमध्ये 7-सीटर कारची मागणी वाढली आहे. यादरम्यान मारुती सुझुकीची एर्टिगा ही एक उत्तम 7-सीटर कार आहे, जिची भारतीय मार्केटमध्ये लोकप्रियता खूप आहे. ही कार पेट्रोलसह सीएनजी व्हर्जनमध्येही येते. त्यामुळे ही कारच्या खरेदीदारांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. कंपनीने 15 मार्चला अपडेटेड एर्टिगा लाँच केली आणि तेव्हापासून ही एमपीव्ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे. 

मारुती सुझुकी एर्टिगा LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा 4 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यासोबतच कंपनीने या कारला सात वेगवेगळ्या कलरच्या ऑप्शनमध्येही बाजारात आणले आहे. एर्टिगाच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 102bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटशी जोडले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, एक सीएनजी व्हर्जन देखील मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये 87bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क देते. सीएनजी व्हर्जनचे मायलेज 26 किमीपर्यंत आहे. 

प्रतीक्षा कालावधी किती?
या एमपीव्हीची किंमत LXi (O) MT व्हेरिएंटसाठी 8,64,000 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप ट्रिम ZXi+ AT व्हेरिएंटपर्यंत 13,08,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. या सर्व किंमती एक्स-शोरूम आधारावर आहेत. या किंमती उपलब्ध व्हेरिएंट, कलर आणि प्रदेशानुसार बदलू शकतात. तसेच, दिल्लीतील मारुती एर्टिगासाठी प्रतीक्षा कालावधी 40 ते 90 आठवड्यांपर्यंत असू शकतो. हा प्रतीक्षा कालावधी शोरूम आणि वेरिएंटनुसार वेगवेगळी असू शकतो. त्यामुळे तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर स्थानिक डीलरशी संपर्क साधून प्रतीक्षा कालावधीबद्दल माहिती मिळवणे फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, ही एमपीव्ही रेनॉल्ट ट्रायबर आणि किया केरेन्स सारख्या कारला टक्कर देऊ शकते. 

Web Title: maruti suzuki ertiga best selling mpv in india price and mileage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.