Maruti Suzuki Expensive MPV: मारुती गर्भश्रीमंतांसाठी बदलतेय! आणतेय सर्वात महागडी सात सीटर कार; किंमत पाहून उडाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:52 PM2023-02-21T12:52:54+5:302023-02-21T12:54:14+5:30
भारतीय बाजारात मारुती सुझुकी ही आतापर्यंत सर्वसामान्यांची कार कंपनी म्हणून ओळखली जात होती. सर्वांना परवडणाऱ्या कार असल्याने लोकही त्या घेत होते.
भारतीय बाजारात मारुती सुझुकी ही आतापर्यंत सर्वसामान्यांची कार कंपनी म्हणून ओळखली जात होती. सर्वांना परवडणाऱ्या कार असल्याने लोकही त्या घेत होते. परंतू आता मारुती हळहळू श्रीमंतांक़डे वळू लागली आहे. यामुळे मारुतीच्या कार आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत. आता मारुतीची अल्टो देखील साडेचार-पाच लाखांना मिळू लागली आहे.
कारच्या किंमतवाढीला महागाई हे एक कारण आहेच, परंतू ही एवढी छोटी कारही आता हाताबाहेर जाऊ लागली आहे. असे असताना मारुतीने श्रीमंतांसाठी प्रमिअम विंग नेक्सा सुरु केली होती. त्याद्वारे मारुती मध्य वर्गातील श्रीमंतांना आकर्षित करत होती. आता अतीश्रीमंतांसाठी मारुती कार आणत आहे.
मारुतीकडे सध्या एक्सएल ६ ही प्रिमिअम कार आहे. परंतू त्या कारपेक्षाही दुप्पट किंमत असलेली कार मारुती आणत आहे. येत्या काळात मारुती टोयोटाची Innova Hycross आपल्या बॅजवर बाजारात लाँच करणार असल्याचे वृत्त आहे. बलेनो-ग्लांझा, विटारा-हायराईडर, ब्रेझा-अर्बन क्रूझर अशा काही कार मारुती आणि टोयोटाने आणल्या आहेत.
यावेळी मारुती सुझुकी टोयोटाच्या प्रसिद्ध एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉसवर आधारित बहुउद्देशीय वाहन लॉन्च करण्याच्या योजनेवर काम करत आहे. मारुती सुझुकीच्या वाहन पोर्टफोलिओमधील मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही सर्वात महागडी कार आहे. या SUV ची सुरुवातीची किंमत 10.45 लाख रुपये आहे आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 19.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. परंतू हायक्रॉसची किंमत सुमारे 25 ते 30 लाख रुपये असणार आहे. मारुतीच्या या एमपीव्हीचे उत्पादन टोयोटाच्या बेंगळुरूजवळील बिड्डी येथे असलेल्या प्लांटमध्ये केले जाईल. याच ठिकाणी मारुतीच्या ग्रँड विटारा एसयूव्हीचे उत्पादन घेतले जात आहे.