Maruti Fronx CNG: स्पोर्टी स्टाइल...जबरदस्त मायलेज आणि स्वस्त! येतेय Maruti ची नवी सीएनजी SUV

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:47 PM2023-02-15T12:47:32+5:302023-02-15T12:49:17+5:30

मारुती सुझुकीनं ऑटो एक्स्पोमध्ये आपली नवी कॉम्पॅक्ट SUV Maruti Fronx सादर केली होती.

maruti suzuki fronx cng to be launch soon spied testing expected price mileage and features | Maruti Fronx CNG: स्पोर्टी स्टाइल...जबरदस्त मायलेज आणि स्वस्त! येतेय Maruti ची नवी सीएनजी SUV

Maruti Fronx CNG: स्पोर्टी स्टाइल...जबरदस्त मायलेज आणि स्वस्त! येतेय Maruti ची नवी सीएनजी SUV

googlenewsNext

नवी दिल्ली-

मारुती सुझुकीनं ऑटो एक्स्पोमध्ये आपली नवी कॉम्पॅक्ट SUV Maruti Fronx सादर केली होती. याच दरम्यान या कारसाठीची बुकिंग देखील अधिकृतरित्या सुरू करण्यात आली होती. इच्छुकांना कंपनीच्या वेबसाइट आणि NEXA डीलरशीपच्या माध्यमातून कार बूक करता येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या एसयूव्ही कारचं आता CNG व्हर्जन देखील बाजारात येणार आहे. सीएनजी वाहनांवर मारुतीनं भर दिला आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोमधील जवळपास सर्व गाड्यांचे सीएनजी व्हर्जन उपलब्ध आहेत. नुकतंच Maruti Fronx CNG व्हर्जन टेस्टिंग दरम्यान दिसून आलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार Maruti Fronx कार इमिशन टेस्टिंग इक्युपमेंटसह दिसून आली आहे. यावरुनच कंपनी या कारचं CNG मॉडल बाजारात आणणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. कंपनी एप्रिल महिन्यापासून या कारची विक्री करणार असल्याचं बोललं जात आहे. डीझल इंजिन ऐवजी कंपनी आता रेग्युलर पेट्रोल, हायब्रिड आणि सीएनजी मॉडलसर इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रीत करत आहे. बाजारात दाखल झाल्यानंतर नेक्सा डीलरशीपद्वारे विक्री केली जाणारी ही चौथी CNG कार ठरणार आहे. 

काय असतील फिचर्स?
Fronx Delta व्हेरिअंटमध्ये कंपनी काही खास फिचर्स देणार आहे. जे मिड रेंजच्या तुलनेत अत्यंत उपयुक्त असणार आहेत. या व्हेरिअंटमध्ये 7.0 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट, वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, स्मार्टप्ले प्रो इन्फोटेन्मेंट सिस्टम, व्हाइस असिस्टंट फीचर, ओवर-द-एअर अपडेट,  4-स्पीकर साऊंड सिस्टम, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल विंग मिरर आणि स्टिअरिंग व्हील माऊंडेट कंट्रोल इत्यादी फिचर्स ऑफर करण्यात येणार आहेत. 

किंमत आणि मायलेज किती?
लॉन्चआधीच या कारच्या किमतीबाबत अधिकृत माहिती देणं खूपच कठीण आहे. पण कंपनी या कारची किंमत ८ ते ११ लाख रुपयांच्या घरात ठेवण्याची दाट शक्यता आहे. मारुतीच्या इतर मॉडल प्रमाणे याही कारमध्ये सीएनजी व्हेरिअंटची किंमत रेग्युलर पेट्रोल व्हेरिअंटच्या तुलनेत १ लाख रुपयांनी महाग असू शकतं. मायलेजबाबत बोलायचं झालं तर १.२ लीटर पेट्रोल इंजीन सीएनजी लाइनअप जवळपास ३० किमी प्रतिकिलोग्रॅमचं मायलेज देतं. त्यामुळे नवी Fronx CNG देखील याच जवळपास मायलेज देईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: maruti suzuki fronx cng to be launch soon spied testing expected price mileage and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.