Maruti Grand Vitara CNG: मारुतीची जबरदस्त मायलेज देणारी सीएनजी SUV लॉन्च; जाणून घ्या, अॅडव्हांस्ड फीचर्ससह किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:43 PM2023-01-06T13:43:08+5:302023-01-06T13:43:52+5:30
ही कार Nexa डीलरशिपद्वारे विकली जाणार असून डेल्टा आणि झेटा, अशा दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
मारुती सुझुकी इंडियाने आपल्या प्रसिद्ध SUV Grand Vitara चे नवे CNG व्हेरिअंट आज देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी लाँच केले आहे. ही कार Nexa डीलरशिपद्वारे विकली जाणार असून डेल्टा आणि झेटा, अशा दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यांची किंमत अनुक्रमे 12.85 लाख आणि 14.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी निश्चित करण्यात आली आहे.
नव्या Maruti Grand Vitara CNG मध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेचे नॅच्युरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिन वापरले आहे. हे इंजिन 103bhp एवढी पॉवर आणि 136Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी मोडमध्ये याचे पॉवर आउटपुट थोडे कमी होते आणि CNG मोडवर हे इंजिन 87bhp एवढी पॉवर आणि 121.5Nm चा टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीमध्ये केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन इंजिनचाच पर्याय उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणज, या कारचे सीएनजी व्हर्जन 26.6 किलोमीटर प्रति किलोग्राम पर्यंत मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
Grand Vitara S-CNG चे व्हेरिअंट आणि किंमत (एक्स-शोरूम) -
Delta (MT) 12.85 लाख रुपये
Zeta (MT) 14.84 लाख रुपये
मिळतील हे खास फीचर्स -
कंपनीने बसवलेल्या सीएनजी किट व्यतिरिक्त या एसयूव्हीमध्ये इतर कोणतेही बदल केलेले नाहीत. या एसयूव्हीमध्ये पूर्वीप्रमाणेच, स्मार्ट प्रो प्लस टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम, वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, सुझुकी कनेक्ट, सारखे फीचर्स मिळतात. याशिवाय, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरेमिक सनरूफ, एम्बीएंट लायटिंग, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि हेड-अप डिस्प्ले या एसयूव्हीला अधिकच विशेष बनवते.
सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रँड विटारामध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशनसह (EBD) अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर्ससरखे फीचर्स देण्यात आले आहेत.