Maruti Suzuki jimny : किंमत आणि डिलिव्हरीचा पत्ता नाही, तरीही या कारला नॉनस्टॉप बुकिंग; लाँचपूर्वीच वर्षभराचं वेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 08:49 PM2023-05-11T20:49:44+5:302023-05-11T20:50:52+5:30
या कारला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून लाँच पूर्वीच हजारो बुकिंग्स मिळालेल्या आहेत.
मारुती सुझुकीची मोस्ट अवेटेड जिम्नी जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी या कारचं बुकिंग केलंय त्यांना कारच्या डिलिव्हरीची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत या ऑफरोड एसयूव्हीला 25 हजार बुकिंग मिळाले आहेत. मात्र, त्यानंतर कंपनीनं बुकिंगची आकडेवारी शेअर केलेली नाही. कंपनीनं बुकिंग होल्डवरही ठेवल्याची शक्यता असू शकते. जिम्नी ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आली होती. सध्या तरी त्याच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
तर या कारची बुकिंग अमाऊंट 25 हजार रुपये आहे. जिम्नी झेटा आणि अल्फा या दोन व्हेरियंटमध्ये लाँच केली जाईल. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये ही कार खरेदी करता येऊ शकते. काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी दर महिन्याला 1000 जिम्नी कार्सचं उत्पादन करत आहे. असं मानले जाते की एवढ्या मोठ्या बुकिंगनंतर त्याचा वेटिंग पीरिअड 1 वर्षाच्या वर पोहोचू शकतो.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
जिम्नीमध्ये के-सिरीज 1.5-लिटर इंजिन देण्यात आलंय. या ऑफ रोडर कारमध्ये 1.5 लीटर, 4 सिलेंडर K-15-B पेट्रोल इंजिनदेण्यात आलंय. हे 6,000 RPM वर 101 BHP पॉवर आणि 4,000 RPM वर 130 NM टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आलाय. यामध्ये तुम्हाला फ्लॅट रिक्लाइन सीट्स पाहायला मिळतील. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनं 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्टसह ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर-व्ह्यू कॅमेरा यांसारखे फीचर्स पाहायला मिळतील. यात EBD सह ABS सारखे फीचर्स देखील देण्यात आलेत.