मारुतीने अखेर फासा टाकला! SUV Grand Vitara लाँच; मायलेज 28, पण किंमत देखील लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 04:05 PM2022-09-26T16:05:37+5:302022-09-26T16:06:14+5:30
मारुतीच्या या एसयूव्हीचे बुकिंग आधीच सुरू झाले होते. कंपनीला या कारसाठी आतापर्यंत 55 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत.
मारुती सुझुकीने अखेर आपले फासे टाकले आहेत. नवीन एसयुव्ही ग्रँड व्हिटाराच्या किंमतींची घोषणा केली आहे. ही एक मिड साईज एसयुव्ही आहे आणि मारुतीची पहिलीच हायब्रिड इंजिनवाली कार आहे. महत्वाचे म्हणजे पेट्रोलवरील ही कार डिझेलच्या कारपेक्षाही खूप जास्त मायलेज देणार आहे.
मारुतीच्या या कारमध्ये जबरदस्त फिचर्सही देण्यात आले आहेत. या कारमध्ये सनरुफ फिचर देण्यात आले आहे. यापूर्वी ब्रेझाला सनरुफ देण्यात आला आहे. तसेच या कारची किंमत एक्स शोरुम साडे दहा लाखांपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे. या एसयुव्हीचे टॉप मॉडेल 19.65 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनी या कारला Sigma, Delta, Zeta, Zeta+, Alpha आणि Alpha+ अशा पाच व्हेरिअंटमध्ये उतरवत आहे. ही कार टोयोटा हायरायडरमध्ये काहीही फरक नाहीय. फक्त कंपन्यांच्या नावात फरक आहे. ही कार ह्युंदाईच्या क्रेटा, कियाच्या सेल्टॉसला टक्कर देणार आहे.
मारुतीच्या या एसयूव्हीचे बुकिंग आधीच सुरू झाले होते. कंपनीला या कारसाठी आतापर्यंत 55 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. ही कार हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे काही व्हेरिअंटचे वेटिंग ५ ते सहा महिन्यांवर पोहोचले आहे. या नवीन SUV मध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन बसविण्यात आले आहे. हे इंजिन 115 hp पॉवर आणि 141 Nm टॉर्क जनरेट करते. हायब्रिडवर चालविल्यास हायब्रिड इंजिन ताकदीला थोडे मार खाते. ते 103 hp पॉवर आणि 135 Nm टॉर्क जनरेट करते. स्ट्रॉन्ग हाइब्रिड मोडमध्ये ही कार 28 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.
पॅनोरामिक सनरूफ व्यतिरिक्त, ग्रँड विटारामध्ये 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. ग्रँड विटारा ही कार जपानच्या दोन्ही कंपन्या टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशन यांनी एकत्रित विकसित केली आहे. या एसयूव्हीमध्ये मारुतीने फ्रंटला मोठी ग्रिल दिली आहे. याशिवाय थ्री-पॉड डीआरएल युनिट, ट्रंकवर स्ट्रेच्ड एलईडी बार आदी फिचर्स देण्यात आले आहेत. SUV Grand Vitara मध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, हेड-अप डिस्प्लेसह देण्यात आली आहे. भारतीय कार बाजारात एकट्या मारुती सुझुकीचा हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक होता, तो आता ४० टक्क्यांवर आला आहे. मारुतीला या सेगमेंटमध्ये कधीच यश आलेले नाही.