Maruti Suzuki नं लॉन्च केली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, देईल 27KM मायलेज, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:59 PM2022-11-22T15:59:02+5:302022-11-22T16:00:58+5:30
सध्या मारुती ईको ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी व्हॅन आहे. तसेच सर्वात स्वस्त 7 सीटर कारही आहे.
मारुती सुझुकीने भारतीय बाजारात आता आपली ईको कार (Maruti Suzuki Eeco) नव्या आवतारात लॉन्ट लेरी आहे. कंपनीने ही अपडेटेड ईको एमपीव्ही 5.10 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवाती किमतत लॉन्च केली आहे. ही कार एकूण 13 व्हेरिअंटमध्ये विकली जाईल. यात 5-सीटर कॉन्फिगरेशन, 7-सीटर कॉन्फिगरेशन, कार्गो, टूर आणि अॅम्ब्युलन्स व्हर्जनचा समावेश असेल. आता या कारमध्ये एक्सटीरिअर सोबतच इंजिनमध्येही अपग्रेड करण्यात आले आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह सीएनजी किटमध्येही उपलब्ध होईल.
सध्या मारुती ईको ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी व्हॅन आहे. तसेच सर्वात स्वस्त 7 सीटर कारही आहे. मारुती सुझुकी इंडियाचे सिनिअर एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर, मार्केटिंग आणि सेल्स शशांक श्रीवास्तव यांनी दिलेल्या महितीनुसार, "लॉन्च झाल्यापासून गेल्या एका दसशकात तब्बल 9.75 लाखहून अधिक लोकांनी ही कार खरेदी केली आहे. 93% बाजारातील हिस्सेदारीसह ही कार आपल्या सेगमेन्टमध्ये टॉपवर आहे."
इंजिन आणि मायलेज -
या कारमध्ये आता मारुतीचे नवे 1.2-लीटर डुअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हेच इंजिन डिझायर, स्विफ्ट, बलेनो आणि इत मॉडेलमध्येही देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 आरपीएमवर 80.76 पीएसची पॉवर आणि 104.4 एनएमचा पीक टॉर्क आउटपूट देते. हे इंजिन पूर्वीच्या इंजिनच्या तुलनेत अधिक पॉवरफुल आहे. सीएनजीवर चालल्यास पॉवर घटून 71.65 पीएस आणि टॉर्क कमी होऊन 95 एनएम होतो. कंपनीनुसार, पेट्रोल इंजिनवर हिचे मायलेज 20.20 किमी/लीटर तर सीएनजीसह 27.05 किमी/किग्रा पर्यंत मिळते. मागील इंजिनच्या तुलनेत हे इंजिन 29 टक्के अधिक फ्यूअल इफिशिअंट आहे.
Maruti Suzuki Eeco फीचर्स -
मारुती सुझुकी ईकोमध्ये रेक्लाइनिंग फ्रंट सीट्स, केबिन एअर फिल्टर (एसी व्हेरिअँटमध्ये) आणि एक नवीन बॅटरी सेव्हर फंक्शन मिळते. हिला नवे डिजिटल इंस्ट्रूमेन्ट कलस्टर, नवे स्टिअरिंग व्हील आणि एसीसाठी रोटरी कंट्रोल मिळते. सेफ्टीसाठी इंजिन इमोबिलायझर, हॅजार्ड स्विच, डुअल एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, दरवाजे आणि विंडोजसाठी चाइल्ड लॉक आणि रिवर्स पार्किंग सेंसर देण्यात आले आहे.