एरिनानंतर मारुतीने नेक्सावरही जाहीर केली सवलत, बलेनोसह 'या' कारवर मोठी सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:29 PM2022-11-08T12:29:57+5:302022-11-08T12:30:35+5:30

maruti suzuki : कंपनी अल्टो, सेलेरियो आणि वॅगन आर यांसारख्या स्वस्त कार मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

maruti suzuki nexa cars ignis ciaz baleno cng car discounts offer alto wagonr celerio brezza swift | एरिनानंतर मारुतीने नेक्सावरही जाहीर केली सवलत, बलेनोसह 'या' कारवर मोठी सूट!

एरिनानंतर मारुतीने नेक्सावरही जाहीर केली सवलत, बलेनोसह 'या' कारवर मोठी सूट!

Next

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी नोव्हेंबरमध्ये आपल्या प्रीमियम नेक्सा मॉडेल्स इग्निस, सियाझ आणि बलेनोवर 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. दरम्यान, ही सवलत तीन मॉडेल्सपर्यंत मर्यादित आहे आणि नुकत्याच लाँच झालेल्या मारुती सुझुकी XL6 वर कोणतीही सवलत उपलब्ध नाही, परंतु ही सवलत बलेनो सीएनजीवर उपलब्ध आहे.

यापूर्वी मारुती सुझुकीने एरिना लाइनअपच्या गाड्यांवर सूट जाहीर केली होती. कंपनी अल्टो, सेलेरियो आणि वॅगन आर यांसारख्या स्वस्त कार मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय, मारुतीने नुकतेच बलेनो आणि XL6 च्या सीएनजी मॉडेल्स लाँच केले आहेत आणि त्यांच्या सीएनजी लाइनअपचा विस्तार केला आहे.

मारुती सुझुकी सियाझ
मारुती सुझुकी सियाझवरील सवलतींबद्दल बोलायचे झाल्यास, या मिड साइज सेडानच्या सर्व मॅन्युअल व्हेरिएंटवर 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तर याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 30,000 रुपयांची सूट मिळत आहे. मारुती सुझुकी सियाझची भारतातील होंडा सिटी, ह्युंदाई वेर्ना, स्कोडा स्लाव्हिया आणि फोक्सवॅगन व्हर्टससोबत टक्कर होणार आहे. या कारला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरच्या मदतीने 103 bhp आणि 138 Nm टॉर्क बनवते. मारुती सुझुकी सियाझसह 20.6 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे.

मारुती सुझुकी इग्निस
मारुती सुझुकीची सर्वात आलिशान कार इग्निसवर नोव्हेंबरमध्ये सर्वात मोठी सूट मिळत आहे. मारुती सुझुकी इग्निसच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, तर ऑटोमॅटिक मॉडेल्सवर 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुती सुझुकी इग्निस 1.2-लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिनसह येते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटीच्या मदतीने 82 बीएचपी आणि 113 एनएम पीक टॉर्क बनवते.

मारुती सुझुकी बलेनो
मारुती सुझुकी बलेनोवर पेट्रोलवर तसेच नुकत्याच लाँच झालेल्या सीएमजी मॉडेलवर 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मारुती सुझुकी बलेनोने या वर्षाच्या सुरुवातीला कॉस्मेटिक अपडेट्स आणि अनेक नवीन फीचर्ससह अपडेटेड बलेनो लाँच केली. अपडेटेड बलेनोला अनेक टेक्निकल अपडेट मिळाले आहेत, जसे की एचयूडी युनिट आणि कनेक्टेड कार टेक, ज्यामुळे युजर्सला स्मार्टवॉचद्वारे देखील कार स्टार्ट करता येऊ शकते.

Web Title: maruti suzuki nexa cars ignis ciaz baleno cng car discounts offer alto wagonr celerio brezza swift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.