Maruti Suzuki Car : मारुतीचा ग्राहकांना झटका, बंद केली पॉप्युलर कार; सेफ्टीमध्ये मिळाले होते ‘झीरो’ रेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 04:32 PM2022-05-28T16:32:25+5:302022-05-28T16:32:51+5:30
Maruti Suzuki : या कारला होती मोठी मागणी.
Maruti EECO Discontinued: मारुती सुझुकीकडून एक वाईट तर एक चांगली बातमी समोर आली आहे. वाईट बातमी अशी आहे की कंपनी आपली 7 सीटर मल्टी पर्पज व्हेइकल Eeco बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Rushlane च्या एका रिपोर्टनुसार मारुती Eeco या कारचे सध्याचे व्हेरिअंट बंद करत आहे. त्याचवेळी, कंपनी दिवाळीच्या आसपास न्यू जनरेशन इको लॉन्च करणार आहे. कंपनीने पहिल्यांदा 2010 मध्ये Eeco लान्च केली होती. व्यावसायिक वाहन म्हणून या कारला मोठी मागणी आहे. हे मॉडेल बंद करण्याचे कारण सुरक्षितता देखील आहे. NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला शून्य रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, न्यू जनरेशन इको ही अधिक चांगल्या सेफ्टी फीचर्ससह येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मारुती सुझुकी वर्षाच्या शेवटी न्यू जनरेशन Eeco लॉन्च करू शकते. सणासुदीच्या काळात ती लॉन्च केले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सेगमेंटमधील ती एकमेव कार आहे. या कारशी स्पर्धा करण्यासाठी दुसरे कोणतेही मॉडेल नाही. अशा परिस्थितीत इकोशी थेट स्पर्धा होणार नाही. अशा परिस्थितीत ती PV आणि CV या दोन्ही सेगमेंटमध्ये चांगली विक्री करू शकते.
19731 गाड्या केल्या होत्या रिकॉल
मारुती इकोचे रिम साईज चुकीच्या पद्धतीनं तयार करण्यात आले होते. या वाहनांचं उत्पादन 19 जुलै 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान करण्यात आलं होतं. यामुळे गाड्यांचा परफॉर्मन्सही खराब होत होता. या पार्श्वभूमीवर कंपनीनं 19731 युनिट्स परत मागवल्या होत्या. नवी मारुती सुझुकी इको आता 2 एअर बॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर आणि एबीएससोबत येते. यात एसीही देण्यात आला आहे.