Maruti Suzuki ने घेतला निस्सान, कियाचा धसका; स्वस्त एसयुव्ही आणण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 11:22 AM2020-12-17T11:22:06+5:302020-12-17T11:24:12+5:30

Maruti Suzuki : या कारचे कुप किंवा मिनी क्रॉस ओव्हरसारखे डिझाईन असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयुव्हींनी वेगाने पकड मिळविली आहे. यामुळे कंपनी या सेगमेंटमध्ये आणखी एक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Maruti Suzuki Preparing to bring cheap compact SUV ytb after nissan magnite | Maruti Suzuki ने घेतला निस्सान, कियाचा धसका; स्वस्त एसयुव्ही आणण्याची तयारी

Maruti Suzuki ने घेतला निस्सान, कियाचा धसका; स्वस्त एसयुव्ही आणण्याची तयारी

googlenewsNext

भारताची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय बाजारात लवकरच एक कॉम्पॅक्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल म्हणजेच एसयुव्ही लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही भारतातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार असून  ती पॉप्युलर हॅचबॅक Baleno वर आधारित असणार आहे. या एसयुव्हीचे कोडनेम ‘YTB’ ठेवण्यात येणार आहे. 


Maruti Suzuki च्या या कारचे कुप किंवा मिनी क्रॉस ओव्हरसारखे डिझाईन असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयुव्हींनी वेगाने पकड मिळविली आहे. यामुळे कंपनी या सेगमेंटमध्ये आणखी एक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. निस्सान इंडियाने नुकतीच ४.९९ लाख एवढ्या कमी किंमतीत Nissan Magnite लाँच केल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे फोर्ड या सेगमेंटचा पायोनिअर असला तरीही किया आणि ह्युंदाई या सेगमेंटमध्ये पाय पसरू लागले आहेत. ह्युंदाईकडे व्हेन्यू आणि कियाकडे सोनेट या अद्ययावत कार आहेत. या कारनी भारतीय बाजारात जलवा करण्यास सुरुवात केल्याने मारुतीलाही आता नवीन कारची गरज भासू लागली आहे. 


नवीन कार अंतर्गत रचनेत बलेनोसारखीच असणार आहे. यामध्ये जास्त बदल केला जाणार नाही. मात्र, डिझाईन आणि बाहेरील रचना ही काहीशी एसयुव्ही सारखी असणार आहे. यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ऑटो कंपन्या त्यांच्या ताफ्यातील कार वाढविण्यासाठी हा खेळ करतात. यामध्ये एखाद्या पॉप्युलर प्लॅटफॉर्मवर नवीन कार बनविली जाते. यामुळे बाजारात लवकर पकड बनविता येते. 
YTB ही कंपनीची दुसरी कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. Maruti Suzuki Vitara Brezza ही कंपनीची पहिली एसयुव्ही आहे. ही कार २०१६ मध्ये लाँच करण्यात आली होती. मारुतीला या सेगमेंटमध्ये विस्तार करायचा आहे. 


मारुती, टाटाला जोरदार टक्कर; स्विफ्टपेक्षाही स्वस्त, 4.99 लाखांत कॉम्पॅक्ट SUV लाँच
 

निस्सान इंडियाने त्यांच्या नव्या निस्सान मॅग्नाईटच्या किमती जाहीर केल्या आहेत. Nissan Magnite ची विशेष किंमत ही 4,99,000 लाखांत ठेवण्यात आली आहे. ही किंमत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे. या नव्या छोट्या एसयुव्हीमध्ये लाइट्सएबर-स्टाइल टर्न इंडिकेटर्ससह अत्यंत शैलीदार असे हेडलँप्स, एल-शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), डॉमिनेटिंग फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स, बियंट/मूड लायटिंग, जेबीएलचे प्रीमिअम स्पीकर्स देण्यात आले आहेत.  ६०-४० स्प्लिट फोल्टेबर रिअर सीटही देण्यात आली आहे. यामुळे लगेज स्पेस वाढविता येते. लगेज स्पेसची क्षमता ३३६ लीटर एवढी आहे.

Web Title: Maruti Suzuki Preparing to bring cheap compact SUV ytb after nissan magnite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.