बापरे!...म्हणून मारुतीने 1 लाख 34 हजार वॅगनआर अन् बलेनो गाड्या मागवल्या परत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:24 PM2020-07-15T15:24:52+5:302020-07-15T15:31:55+5:30

कंपनीने 5 नोव्हेंबर 2018 ते 15 ऑक्टोबर 2019दरम्यान बनविलेले 1 लिटर पेट्रोल इंजिनवाल्या वॅगनआर आणि 8 जानेवारी 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 दरम्यान बनविलेल्या बलेनो (पेट्रोल) कार परत मागविल्या आहेत.

maruti suzuki to recall 1 lakh 34 thousand units of baleno and wagonr how to check | बापरे!...म्हणून मारुतीने 1 लाख 34 हजार वॅगनआर अन् बलेनो गाड्या मागवल्या परत 

बापरे!...म्हणून मारुतीने 1 लाख 34 हजार वॅगनआर अन् बलेनो गाड्या मागवल्या परत 

Next

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (मारुती सुझुकी) आपल्या दोन मोठ्या कार मॉडेल्स वॅगनआर आणि बलेनोच्या एकूण 1 लाख 34 हजार 885 कार परत मागवल्या आहेत. कंपनीने 5 नोव्हेंबर 2018 ते 15 ऑक्टोबर 2019दरम्यान बनविलेले 1 लिटर पेट्रोल इंजिनवाल्या वॅगनआर आणि 8 जानेवारी 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 दरम्यान बनविलेल्या बलेनो (पेट्रोल) कार परत मागविल्या आहेत. या मॉडेल्सच्या इंधन पंपामध्ये काही त्रुटी आढळल्यानं कंपनीने त्यांना परत मागवले आहे.

वॅगनआर आणि बलेनो
इंधन पंपामध्ये बिघाड असण्याच्या कारणास्तव वॅगनआरचे 56,663 युनिट आणि बलेनोच्या 78,222 युनिट गाड्या परत मागवण्यात आल्याचं कंपनीने सांगितले आहे. या मोहिमेंतर्गत अधिकृत डीलर्समार्फत वाहनांच्या मालकांशी संपर्क साधला जाणार आहे.

अशा प्रकारे चेक करा लिस्टमधले आपले नाव 
कंपनीच्या अधिकृत वेबसाइट marutisuzuki.com भेट देऊन ग्राहक या यादीमध्ये त्यांचा वॅगनआर कारचा समावेश केलेला आहे की नाही हे देखील तपासू शकतात. यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या 'Important Customer Info' सेक्शनवर क्लिक करा. तेथे वॅगनआरच्या रिकॉलबद्दल माहिती दिली गेली आहे, त्यावर क्लिक केल्यावर एक पृष्ठ उघडेल आणि त्याखाली 'येथे क्लिक करा' पर्याय सापडेल. तिथे क्लिक केल्यावर एक बॉक्स उघडेल, ज्यामध्ये आपल्याला चेसिस क्रमांकाची माहिती मिळेल.

हेही वाचा


पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब- अशोक चव्हाण

रिलायन्सचे शेअर्स नव्या उच्चांकांवर; आज होऊ शकतात मोठ्या घोषणा

RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात, येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात होऊ शकते मोठी वाढ

CoronaVirus:लढ्याला यश! देशात Covaxinनंतर कोरोनावरच्या दुसऱ्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरू

अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा

कौतुकास्पद! IAS ऑफिसरनं दाखवले आपले CBSE बोर्डाच्या परीक्षेचे प्रशस्तिपत्रक अन् म्हणाले....

चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले

बोगस रेशन कार्डवर आता मिळणार नाही तांदूळ अन् गहू; 'अशा' पद्धतीनं वगळलं जाणार नाव

NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...

20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला!

अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर

Web Title: maruti suzuki to recall 1 lakh 34 thousand units of baleno and wagonr how to check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.